लवकरच बाप बनणार आहे वरुण धवन? पत्नी नताशा सोबत फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी विचारत आहेत, “प्रेग्नेंट आहे का?
मित्रांनो नुकतेच करवाचौथ संपूर्ण देशभरात जल्लोषात साजरे करण्यात आले. बॉलीवुड सिताऱ्यांनी सुद्धा यावर्षी धूमधडाक्यात हा सण साजरा केला. त्यामुळे नवीन जोडप्यांचा उत्साह हा खरंच पाहण्यासारखा होता. यामधील एक सुंदर आणि पॉप्युलर जोडपे म्हणजे अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल.
नताशाचे हे पहिलेच करवाचौथ होते. त्यामुळे वरुण देखील खुश दिसत होता. आपल्या पहिल्याच करवाचौथ दरम्यानचे बरेचसे फोटोज् या कपलने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोज् मध्ये हे दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. परंतु या फोटोज् मध्ये युजर्सना काहीतरी विशेष दिसले, त्यामुळे त्यांनी कमेंट्स मध्ये विचारायला सुरुवात केली की,”गुङ न्यूज आहे का?”
रविवारी करवाचौथ च्या दिवशी नताशाने चंद्र पाहिल्यावर वरुणचा चेहरा पाहून आपला उपवास सोडला. यादरम्यान दोघांमधील अंदाज खूपच खास होता. वरुण ने ट्रेङिशनल कपडे घातले होते. तर नताशा सुद्धा छान नटून- थटून तयार झाली होती. फॅन्स त्यांच्या सौंदर्याची खूप स्तुती करत होते. वरुण धवन ने आपले हे फोटोज् शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिले की,”मून प्लीज…. सर्वांना करवाचौथ च्या हार्दिक शुभेच्छा.”
काय नताशा प्रेग्नंट आहे का?
वरुण आणि नताशाचे हे फोटोज् वायरल होताच त्यांच्या फॅन्स ने तर एकापाठोपाठ एक असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सर्वांचा प्रश्न हाच होता की, नताशा प्रेग्नंट आहे का? हो, परंतु लोक सुद्धा या गुङ न्यूज मुळे खूप खुश होते. त्याचे झाले असे की, यामध्ये चूक तर लोकांची सुद्धा नाही हो…..कारण वरुण ने शेयर केलेल्या फोटोमधील एका फोटोवर त्याने नताशाच्या पोटावर हात ठेवला होता. युजर्स ला मात्र ही पोज काही समजली नाही. त्यामुळे त्यांचा असा समज झाला की, नताशा आणि वरुण यांच्या घरी एक नवा छोटासा पाहुणा येणार असावा.
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह 24 जानेवारीला आपले कुटुंबीय आणि काही जवळच्या नातेवाईकांमध्येच झाला. त्यांच्या लग्नाचे फोटोज् सोशल मीडियावर देखील वायरल करण्यात आले आहेत. तर सध्या वरुण धवन आपला आगामी चित्रपट “भेङिया” च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट हॉरर- कॉमेडी आहे. वरुण धवन या चित्रपटाचे शूटिंग अरुणाचल प्रदेश मध्ये सुरु आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.