समर्थ रामदास स्वामींनी स्वतः स्थापन केलेले महाराष्ट्रातील “हे” ११ सुप्रसिद्ध मारुती आपणांस माहिती आहेत काय?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो!, आपल्या या राकट, रांगड्या महाराष्ट्राला महान संत परंपरा लाभली आहे. संतांनी भक्ती व उपासनेचे सामर्थ्य सर्वांना पटवून दिले आहे. मात्र, ताकद, शक्ती आणि सामर्थ्याची उपासना देखील महत्त्वाची आहे, हे सांगणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम आणि हनुमानाला आराध्य मानून बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात केली. रामदास स्वामींनी तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली. (Samarth Ramdas Swami established 11 Maruti Temples) संघटना बांधायची, तरुणांना बलोपासनेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत तब्बल ११ मारुतींची स्थापना केलेली आहे. अगदी दोन दिवसांतही या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो.

2020 12 20

चाफळचा वीर मारुती : इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळ येथे केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना समर्थांनी केली. १९६७ साली को’य’नेचा भू’कं’प झाला, त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हा’नी पोचली नाही, असे सांगितले जाते.

See also  अरेंज मॅरेज करताना करताना करा फक्त हे काम, लव्ह मॅरेजवाल्यांपेक्षा देखील सुखी आयुष्य जगालं...

Chaphal maruti

भीम/वीर मारुती : चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे सुमारे १०० मीटर चालत गेल्यावर रामदास स्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आणखीन एक मंदिर आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच रौद्र मुद्रेत आहेत. दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.

512px Shinganwadi Maruti%2C Sajjangad

शिंगणवाडीचा मारुती: चाफळचा तिसरा मारुती, खडीचा मारुती, बालमारुती, असेही या मारुतीला संबोधनले जाते. चाफळपासून साधारण १ कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेले रामघळ आहे. याच ठिकाणी इ.स. १६५० मध्ये समर्थांनी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. चाफळच्या आधी समर्थांचा मठ इथेच शिंगणवाडीला होता.

images

माजगावचा मारुती: चाफळपासून केवळ ३ कि.मी. अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्ट्य आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. गावकऱ्यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी इ.स. १६५० मध्ये याच धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे.

See also  प्रेमात पडल्यावर आपल्या प्रेयसीसाठी या गोष्टी करतात मुलं, ज्या लहानसहान गोष्टी मूलींना देखील खूप आवडतात...

download

उंब्रजचा मारुती: उंब्रज येथे ३ मारुती आहेत. त्यातला १ हा उंब्रजचा मठातील मारुती. इ. स. १६५० मध्ये समर्थांनी एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन गेले, असे सांगितले जाते.

15284521614 9fb1e82212 b

मसूरचा मारुती: उंब्रजपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या मसूर इथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. पूर्वाभिमुख असलेली ही मारुती मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी अशीच आहे. इ.स. १६४६ साली या मंदिराची स्थापना समर्थांनी केली.

27867580 145479406146807 5427552500791992787 n

बत्तीस शिराळ्याचा मारुती: सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे गाव नागांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील एस.टी. स्टँडजवळच हे मारुतीचे मंदिर आहे. इ.स. १६५५ साली समर्थ रामदास स्वामींनी येथे मारुतीची स्थापना केली. मूर्तीच्या डोक्यावर डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो.

download%2B%25281%2529

शहापूरचा मारुती: कराड-मसूर रस्त्यावर १५ कि.मी. आणि मसूरपासून ३ कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. तेथून एक कि.मी. अंतरावर हे मारुती मंदिर आहे. इ.स. १६४५ साली समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते.

See also  वाराणसीच्या गल्ली गल्लीत समाजाच्या सेवेत “बाईक एम्बूलंस” घेऊन फिरतो हा युवक, देतो फ्री सेवा कारण...

15287157063 0944a50e1c b

बाहे-बोरगावचा मारुती: सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बाहे गाव आहे. या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल, अशा आशेने गेलेल्या समर्थाना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थांनी डोहात बुडी मा’रू’न तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली.

AF1QipP9px5BLKhX DER3wGYC7Miir6MKeYn7 uwyBWh=s16000

मनपाडळेचा मारुती: मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी इ.स. १६५२ मध्ये केली.

AF1QipO1O2tFhkhO

पारगावचा मारुती: या मारुतीला बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती, असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वांत शेवटी स्थापलेला आणि सर्वांत लहान मूर्ती असलेला आहे.
।। जय श्रीराम, जय बजरंगबली ।।

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment