खऱ्या अर्थाने तेव्हाच भारत स्वतंत्र होईल….

मागच्या वर्षीची आठवण. खुपच धावपळ सुरु होती त्या दिवशी. सकाळी लवकरच निघालो होतो कॉलेज ला जायला. कारण स्वातंत्र्यदिन. सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस. त्या दिवशी ध्वजारोहण साठी जायचं होत. गाडीवरती माघे मित्र बसला होता. चौकात गाडी सिग्नलला थांबली. एक लहान मुलगा तिरंगी झेंडे विकत होता. तो इतका लहान होता कि कदाचित त्या तिरंग्याचा पुर्ण इतिहास त्याला माहित नसावा, अगदी २-३ वर्षाचा वाटत होता तो

 

मी माझ्या मित्राला सहज विचारलं, “याच्याकडे पाहून काय वाटतंय ? भारत स्वतंत्र झालाय का रे खरचं..?”
मित्र म्हणे, “जेव्हा तिरंगा असा लहान मुलांच्या हातून विकला जाणार नाही आणि ती समोरची सगळी मुले जी झेंडे विकत आहेत, ती मुले अस रस्त्यावर फिरण्यापेक्षा शाळेत शिक्षण घेतील ना , तेव्हाच भारत स्वतंत्र होईल….”

कॉलेज मध्ये पोहोचलो. ध्वजारोहणा चा कार्यक्रम सुरु होता. मात्र त्या संपुर्ण वेळेत तो रस्त्यावरील मुलगा सारखा डोळ्यासमोर दिसत होता. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपवून परत माघारी यायला निघालो. चौक तोचं मात्र आता रस्ता निराळा आणी व्यक्ती देखील निराळी. एक भिकारी सिग्नलला भीक माघत फिरत होता.

मी मित्राला पुन्हा विचारलं, “आता याच्याकडे पाहून काय वाटतंय ?” मित्रही हुशार. तो म्हणे, “ एकाही चौकात एकही भिकारी असा वणवण फिरून भीक माघत नसेल, पोट भरण्या इतपत प्रत्येकाच्या हाताला काम असेल ना, तेव्हाच भारत स्वतंत्र होईल….”

आता भूक लागल्याने नाश्ता करावं म्हटलं म्हणून एका हॉटेल समोर गाडी थांबवली. आत गेल्यावर वेटर ला पोहे आणायला सांगितले. त्यानेही मस्त पैकी साउंड सिस्टम वरती देशभक्तीपर गीत लावले होते. वातावरण प्रसन्न वाटत होते. आम्ही दोघे ज्या टेबलवर बसलो होतो त्याच्या शेजारच्या टेबलवर ५ मुली बसल्या होत्या. त्यातील एक रडत होती. आम्ही दोघे गप्पा मारत असताना त्यांच्याही गप्पा आमच्या कानावर येत होतय.

त्यावरून असं कळलं की, त्या रडणाऱ्या मुलीची कुणीतरी छेड काढली होती. यावर पुन्हा मित्राला पुन्हा विचारलं “ बोल भाई आता…याच्याकडे पाहून काय वाटतंय ?” मित्र म्हणे, “ जेव्हा हे असलं सगळं बंद होईल, मुलींची छेड-छाड बंद होईल, अत्याचार कमी होतील, तेव्हाच भारत स्वतंत्र होईल…” खरचं..मानल माझ्या मित्राला.

आता रूमकडे यायला निघालो, रुमच्या काही अगोदरच एका ठिकाणी जोर जोरात भांडण सुरु होत. भांडणच कारण माहित नव्हत. मात्र तुफान खेचाखेची अन बाचाबाची सुरु होती. नको डोक्याला ताण नको म्हणून गाडी जोरात पुढे पळवली अन मित्राला पुन्हा विचारलं “आता रे, आता याच्याकडे पाहून काय वाटतंय ?” मित्र म्हणे, “ हे बघ .. हे असल सगळं मारामारी-हेवेदावे …हे सगळं जेव्हा थांबेल, आपण सारे एक आहोत, जेव्हा एकत्र गुण्या गोविंदाने आपण राहू, तेव्हाचं भारत स्वतंत्र होईल…..”

मित्राच्या या प्रत्येक उत्तराने माझी बोलती बंद केली होती. ७०-७२ वर्षे झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. त्याचाच कार्यक्रम करून येत असताना मनात पुन्हा पुन्हा हाच प्रश्न येत होता कि, खरचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय का…??

मला वाटत, भितीशिवाय जगण, हेच तर खरं स्वातंत्र्य, विकसनशील ते विकसित देश असा प्रवास हेच तर खर स्वातंत्र्य, प्रदुषणा विरुद्ध लढण, हेच तर खर स्वातंत्र्य, स्वातंत्र्य उपभोगण्या इतकंच ती कर्तव्ये बजावण, हेच तर खर स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजेच स्वयंशासन आणि त्यासोबतच येतात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या….आज हा स्वातंत्र्यदिन साजरा करताना काही जबाबदाऱ्यांची स्वत:लाच आठवण करून देऊया…!!

खऱ्या अर्थाने तेव्हाचं भारत स्वतंत्र होईल…..

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • प्रा. विशाल पोपट पवार 9730921981 vishalpwar153@gmail.com

Leave a Comment