मंगळ करत आहे मेष राशी मध्ये प्रवेश, या ६ राशींसाठी खूपच फलदायी असेल मंगळ, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

येत्या रविवारी म्हणजेच दिनांक १६ ऑगस्ट २०२० रोजी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. पुढे मंगळ १० सप्टेंबर २०२० रोजी याच मेष राशीत वक्री होऊन ४ ऑक्टोबर २०२० अखेर राहणार आहे. या कालावधीत सहा राशींसाठी मंगळ ग्रह खरोखरच मंगलदायी ठरणार आहे. तर जाणून घेऊयात या सहा राशी…

मेष :- मंगळाचेच स्वामीत्व असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शुभ संदेश मिळतील. आयुष्याच्या जोडीदाराचे सर्वतोपरी सहकार्य राहील. उद्योजक व व्यावसायिकांना त्यांच्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नोकरी व रोजगार संधीच्या शोधात असणाऱ्यांना संधी उपलब्ध होतील. संतान सुख मिळून मुलांकडून शुभवार्ता मिळतील. मनोकामना सिद्धीस जाण्याचे योग या कालावधीत दिसत आहेत.

See also  श्री स्वामी समर्थ खूपच खुश आहेत या ६ राशींवर, केलेल्या कर्मांची फळे देणार आहेत स्वामी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मिथुन :- मेष राशीत होणारा मंगळ प्रवेश मिथुन राशीसाठी अनेक शुभसंकेत घेऊन येणारा दिसत आहे. या कालावधीत मिथुन राशीचे लोक मजबूत आर्थिक आघाडी घेतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होऊन प्राप्ती वाढण्याचे योग आहेत. विविध मार्गाने संपत्ती संचय होऊन भर पडेल. या काळात खर्चांवर नियंत्रण ठेवून बचतीवर भर देणे इष्ट राहील. रखडलेली कामे मार्गी लागून प्रापंचिक अडचणी सुटण्याचे योग आहेत.

कन्या :- मंगळाच्या मेष राशीतील प्रवेशामुळे कन्या राशीच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. प्रकृतीत सुधारणा होण्याचे शुभसंकेत आहेत. शासकीय योजनांचा फायदा मिळवण्यासाठी हा उत्तम कालावधी ठरेल. सासुरवाडीच्या मंडळींकडून लाभ होण्याचे योग आहेत. अनेक शुभवार्ता कळतील. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दुरच्या यात्रा घडतील. काहींना परदेशगमनाचे योग या काळात दिसत आहेत.

See also  धनसंपत्तीची देवी श्रीमहालक्ष्मीची कृपा होणार या ८ भाग्यवान राशींवर, धन लाभ आणि नोकरी मध्ये होणार फायदा…

वृश्चिक :- मंगळाचा मेष राशी प्रवेश हा वृश्चिक राशीसाठी शुभ फलदायी असेल. केलेल्या श्रमांचे फळ मिळण्याचा हा कालावधी आहे. या काळात आनंद वार्ता मिळतील. आपले विरोधक आणि हितशत्रूचे मनसुबे धुळीस मिळून ते अपयशी ठरतील. उलट त्याचा लाभ वृश्चिक राशीलाच मिळण्याचे योग आहेत. मात्र परिश्रम सोडू नका, जितके परिश्रम जास्त तितकेच शुभ आणि मंगल फल प्राप्तीचे योग आहेत. विद्यार्थीमित्रांना हा राशी बदल उत्तम यश व प्रगतीचे नवनवीन मार्ग प्रदान करणारा ठरेल.

कुंभ :- मंगळाच्या या राशी भ्रमणामुळे कुंभ राशीला अनेक शुभवार्ता मिळतील. कामाच्या ठिकाणी वर्चस्व व दबदबा राहील. विशेष म्हणजे आपल्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. उत्पन्न वाढीचेही योग या कालावधीत दिसत आहेत. परिवार तसेच प्रियजनांची साथ मिळून कष्टाच्या व जिद्दीच्या सहाय्याने तुम्ही लक्ष प्राप्ती कराल. व्यापार-उद्योगात येणारा काळ लाभाचे प्रमाण वाढविणारा आहे. मित्रमंडळींचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळेल.

See also  भोलेनाथ श्री शिवशंकरांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या ५ राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे...

मीन :- मंगळाचा हा मेष राशी प्रवेश मीन राशीसाठी शुभफल प्राप्तीचे योग घेऊन येत आहे. धनसंपत्ती मिळण्याचे शुभ योग दिसत आहेत. अनेक दिवसांची रखडलेली उधारी व येणी वसूल होण्याचे योग आहेत. अडकलेले धन प्राप्त होऊन आर्थिक आघाडी मजबूत होईल. धनसंचय होईल पण, खर्चावर नियंत्रण मात्र हवेच. परिवार व हितचिंतकांची तसेच आयुष्याच्या जोडीदाराची भक्कम साथ मिळेल. आर्थिक कोंडी सुटेल. नातेसंबंधात दृढता येईल.

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार, समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्यपरिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकानिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता. शुभंभवतु:!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment