वाढदिवसाच्या दिवशीच गुपचूप लग्न उरकलं या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सौन्दर्यांने भरलेल्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा आज वाढदिवस होता. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या अभिनयाने आणि डान्स ने तिने वर्चस्व मिळवलं आहे. ती सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून पुढे आलेली आहे. जिच्या बद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे सोनाली कुलकर्णी.

76010771

मोठी नाही लहान सोनाली. कारण मराठी इंडस्ट्रीत दोन सोनाली कुलकर्णी आहेत. मोठी आणि छोटी. तर ही छोटी. तिला तर पहिलं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि वरून मंगल कार्या साठी डबल शुभेच्छा. आता आपल्याला प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊयात सविस्तर चला.

सोनाली कुलकर्णी ने मागच्या वर्षी आधी गुपचूप साखरपुडा उरकला आणि मग फोटो सोशल मीडियावर टाकून चाहत्यांना कळवलं.

See also  लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण घरात राहून नेमकी झाली तरी कशी बरं, ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

82739973

तसं आता साखरपुड्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी केव्हा एकदा लग्नाची गुड न्यूज देतेय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष होतं. अखेर आज तिच्या वाढदिवशी सोनालीने लग्नगाठ बांधली आहे. सोनालीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्षभरापूर्वीच सोनालीने साखरपुडा केला होता.

त्यानंतर चाहते तिच्या लग्नाच्या बातमीच्या प्रतीक्षेत होते. दुबईमध्ये सोनालीने छोटेखानी स्वरुपात लग्नाचा कार्यक्रम उरकला. कोरोनाचं संकट असताना मोठा कार्यक्रम न करता छोटेखानी स्वरुपात तिचं लग्न पार पडलं. आई-वडील भारतात असल्यामुळे त्यांनीही ऑनलाइन मुलीच्या लग्नात हजेरी लावली.

Sonalee Kulkarni Kunal Benodekar Marriage 10

जुलैमध्ये ती लग्न करणार होती, मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तिने ठरलेल्या तारखेच्या आधीच लग्न करायचं ठरवलं. आणि इंग्लंडमध्ये लग्नगाठ बांधली. तिने आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे की, आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’.

See also  मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेची सख्खी बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.

Sonalee Kulkarni Kunal Benodekar Marriage 4

सोनाली कुलकर्णी ने साखरपुडा सारखं लग्न गुपचूप केलं यामुळे चाहते थोडे नाराज असतील. पण ती तरी काय करणार. सध्या काळ अस्थिर आहे. महाराष्ट्र तर खूपच. त्यामुळे तिने कमी माणसं आणि खर्चात खूप योग्य निर्णय घेतलेला आहे. तर तिला या बद्दल म्हणजे वैवाहिक जीवनात प्रवेश केल्याबद्दल स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment