१७ ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश करतोय बुध ग्रह, बाराही राशींना ठरणार फलदायी, जाणून घ्या काय होईल फायदा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अद्भुत फलदायी बुधादित्य राजयोग जुळून आलाय. बारा राशींना देणार कोणती फळें? जाणून घ्या.

दि. १७ ऑगस्ट २०२० म्हणजे श्रावणी सोमवारीच बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. बुध २ सप्टेंबरपर्यंत सिंह राशीतच विराजमान राहील. बुध आणि सिंह यांच्या या संयोगामुळे बुधादित्य योग जुळून येत आहे.

हा योग राजयोगामध्ये गणला जातो. बुध ग्रह हा भाषण, संप्रेषण आणि बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो. हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार हा योग बहुतेक जातकांच्या कुंडलीत आढळतो. यामागील कारण हे आहे की, बुध सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळ आहे. त्यामुळे कुंडलीनुसार त्याचा प्रभाव हा बदलत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग खूप परिणामकारक फलदायी असतो. असा बुधादित्य योग १२ राशींच्या जातकांना कोणती फळे देणार ते जाणून घेऊया…

See also  रविंद्र जडेजाची पत्नी आहे या उच्चश्रीमंत व्यावसायिकाची मूलगी, लग्नाआधीच जावयाला दिली होती 1 कोटीची आलिशान कार...

मेष :- हा योग मेष राशीसाठी शुभ फलदायी असेल. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होईल. नवदाम्पत्यांस संतानप्राप्तीचे योग आहेत. धार्मिक कार्यात रस वाढेल.

वृषभ:- हा योग या राशीच्या जातकांसाठी तितकासा चांगला नाही. या राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक कलहासह मानसिक त्रास देखील सहन करावा लागू शकतो. नवीन भेटीगाठी होतील.

मिथुन :- बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या सरकारी विभागातील कामे पार पाडण्यासाठी हे संक्रमण शुभ आहे. घर खरेदी करण्याचे स्वप्न पहाल. संतती सुख प्राप्त करण्यास अनुकुल काळ.

कर्क :-रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या संक्रमणात, जमिनीशी संबंधित कामे काही दिवसांसाठी पुढे ढकला. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कार्यालयातील राजकारणाला बळी पडू नका.

सिंह :- नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. असलेल्या नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील.

See also  बॉलिवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री मध्य रात्री गेली होती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी, कारण ऐकून थक्क व्हाल!

कन्या :- या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू कमकुवत असू शकते. खूप प्रवास करावा लागेल. परदेशी नागरिकत्व किंवा व्हिसा संबंधित कामात यश मिळू शकते.

तुला :- अचानक धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. घर किंवा जमीन खरेदी करणे शक्य आहे.

वृश्चिक :- परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी केलेले अर्ज यशस्वी होतील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोर्टाशी निगडित बाबी सोडवण्यासाठी उत्तम काळ.

धनु :- विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ. परदेशी कंपनीत अर्ज किंवा परदेशी नागरिकत्वासाठी केलेले अर्ज यशस्वी होतील.

मकर :- आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. आर्थिक बाजू मजबूत होईल.

कुंभ :- व्यवसायासाठी हा काळ चांगला असेल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. तब्येत ठीक होईल. समाजात सन्मान वाढेल.

See also  "जीव झाला येडा पिसा" मधील सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, सोशल मीडियावर कबुली...

मीन :- आर्थिक परिस्थितीवर, आरोग्यावर विपरित परिणाम होईल. गुप्त शत्रूंबद्दल जागरुक राहण्याची गरज आहे. शासकीय कामे पूर्ण करता येतील.

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शुभं भवतु:!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment