हि 22 वर्षांची मुलगी डेअरी फार्मिंगमधून कमवते चक्क 6 लाख रुपये महिना, कसे ते पाहून थक्क व्हाल!

तुम्हाला ही गोष्ट ऐकून कदाचित धक्का बसेल की, एका २२ वर्षाच्या मुलीने महिनाभरात डेअरी फार्मींगच्या व्यवसायावर चक्क ६ लाखांच उत्पन्न एका महिन्याच्या कालावधीत घेतलं आहे.

श्रद्धा धवन नावाची ही मुलगी, तिच्या कुटुंबात याआधी कधी सहापेक्षा जास्त म्हशींची संख्या नव्हतीच, श्रद्धा 21 वर्षांची होती तेव्हा निगोज गावात जे अहमदनगर जिल्ह्यापासून 60 किमी अंतरावर आहे, त्यांच्याकडे केवळ एक म्हैस शिल्लक होती. या काळात श्रद्धाचे वडिल म्हशींच्या खरेदीविक्रीचा व्यवसाय करायचे, म्हशी सांभाळून त्यांच्या दुधाचा व्यवसाय करणं त्यांच्याकरता शक्य होत नव्हतं.

परंतु काही अ’ड’च’णीं’व’र मात करत श्रद्धाने जबाबदारी स्वीकारली आणि ती म्हशीपासून दुधाचा व्यवसाय करू लागली. दुधविक्री करण्यासाठी भाऊ खुप लहान होता आणि वडिलांना वाहन चालवता येत नव्हते अशात स्वत: श्रद्धाने दुधविक्री करायला फिरण्यासाठी पुढाकार घेतला.

सुरूवातीला अनेक डेअरी फार्ममधे बाईकवरच जाऊन श्रद्धा दुध पोहचते करायची, असही तिने सांगितलं. एकप्रकारे खरतरं असचं म्हणावं लागेलं, या नव्या उभरत्या उद्योजिकेच्या जिद्दीला सलाम.

सकाळी सकाळी श्रद्धाचे सगळे क्लासमेट्स शाळा, कॉलेजला जाण्यासाठी तयारी करायचे आणि श्रद्धा मात्र पहाटे लवकर उठून दुधाची काम करून नंतर शिक्षण घ्यायला हजर रहायची. तिने स्वत:च्या कामाबद्दल कधीच ला’ज बा’ळ’ग’ली नाही; हे विशेष महत्त्वाचं आहे. श्रद्धा तिचे वडील सत्ववान यांच्यासोबत आजच्या घडीला ८० म्हशींच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे.

श्रद्धाने वयाच्या ११ व्या वर्षी दुग्धव्यवसायाची जबाबदारी स्वत:वर घेतली होती. जेव्हा श्रद्धा इयत्ता १०वीत होती तेव्हा तब्बल १५० लिटर दुधाची विक्री करण्यापर्यंत त्यांचा व्यवसाय वाढला होता. सध्या आम्ही एक स्थिर व्यवसाय करतो आहोत तसेच महिन्याला सरासरी किमान ३ लाख रूपयांचा नफा सहज होतो आहे, हेदेखील श्रद्धाने मुलाखतीत सांगितले.

शिक्षण घेत असताना माझ्या अभ्यासात प’ड’ले’ला खं’ड मला भरून काढायचा होता आणि सोबतच दुधाबद्दलच्या सर्व तांत्रिक व उत्पादनाच्या दृष्टीने योग्य गोष्टी मला समजून घेण्याची गरज होती, आणि मी ते दिवसेंदिवस आत्मसात करून घेतलं, अशी श्रद्धाची प्रतिक्रिया होती.

या नव्या उभरत्या उद्योजिकेच्या आत्मविश्वासाबद्दल नक्कीच कौतुक वाटण्यासारखं आहे. अनेक विद्यार्थी चांगल्या शिक्षणाकरता गाव सोडून मोठ्या शहरात जातात परंतु श्रद्धाने आपलं पदव्युत्तर शिक्षण भौतिकशास्त्रात घ्यायचं ठरवलं तेही स्वत:च्या गावात.

“एखाद्या मोठ्या ठिकाणी जाऊन माझ्या ज्ञानात प’ड’णा’री भर कमी होईल किंवा मी जगाच्या पाठीवर मागे राहीन”, अशी भि’ती माझ्या मनात कधीच निर्माण झाली नाही असंही श्रद्धा सांगते. श्रद्धा तिच्या कमकुवत बाबींवर आज ओव्हरकम करू शकली आहे. आणि ती ठामपणे ऊभी आहे याचा तिला निश्चितच आनंद आहे.

श्रद्धा सांगते, जेव्हा सुरूवातीला तिने हे काम हाती घेतलं होतं तेव्हा तिला थोडीशी लाज वाटायची आणि आॅकवर्डपणा जाणवायचा, कारण तिने कधीच एखाद्या मुलीला आजवर दुध विकण्यासाठी गाडीवरून फिरताना पाहिलं वा ऐकल नव्हतं. परंतु गावातील काही लोकांनी तिला शाबासकी देत, तिचा आत्मविश्वास द्विगुणित केला.

म्हशींच्या नव्या जन्माला येणाऱ्या रेडक्यांच्या संख्यानी सुरूवातीला जम बसू लागलेल्या व्यवसायावर थोडीशी अ’ड’च’ण निर्माण केली. कारण त्यांना खायला लागणाऱ्या चाऱ्यावर आधीपेक्षा अधिक खर्च होऊ लागला आणि बदल्यात उत्पन्नाची थोडीशी घट होऊ लागली.

अशात घरात केवळ ५ ते १० हजार घरखर्चाला महिन्याचे पैसे शिल्लक ऊरू लागले होते. एका चारचाकीमधून चारा आणल्या जायचा आणि तो म्हशींना पुरवला जायचा, त्या गाडीसोबत श्रद्धाने फोटोदेखील काढला आहे. कार्तिक या तिच्या छोट्या भावाने आपल्या बहिणिचा आदर्श घेत “अनीमल हजबंडरी” विषयात शिक्षण घेतलं आहे. श्रद्धा मुलांसाठी इंटरनेटवर गेस्ट लेक्चरही देत असते.

पुढील भविष्यात आॅर्गेनिक बायप्रोडक्टसची निर्मिती करण्याबाबत आपले काही प्लॅन्स आहेत असंही श्रद्धा सांगते. श्रद्धाच्या मते तिच्या आईवडीलांनी तिला काम करण्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे हे सर्व शक्य झालं. श्रद्धाच्या वडिलांनी तिला सुरूवातीला सहज प्रश्न केला होता, “तू गाडीवर दुध विकू शकशील का?” श्रद्धाच्या मते या प्रश्नानेच खऱ्या अर्थानं आजच त्यांच जग ऊभं राहिलं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment