अर्रर्र या अभिनेत्रीने केली आहे नाकाची शस्त्रक्रिया, तिला ओळखणे देखील होऊन बसले आहे कठीण!
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एकाहून एक सरस अशा मोहक सौंदर्याच्या अभिनेत्री आहेत. ज्यांचे आपल्या देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लाखो फॅन्स आहेत. परंतु तरीदेखील ह्या अभिनेत्री आपल्या फॅन्सना अधिकाधिक स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी कित्येक प्रयत्न करत असतात. यासाठी बरेचदा त्या आपल्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत.
इंङस्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. मात्र काहींची शस्त्रक्रिया ही खूप चांगल्याप्रकारे यशस्वी झाली. तर काहींचा चेहरा पूर्णपणे खराब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या अभिनेत्रींच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झाले आहे, ते म्हणजे दिशा पटानी.
नुकताच अभिनेत्री दिशा पटानी हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. “अंतिम : द फायनल टूथ” या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला तिने हजेरी लावली होती. त्याचदरम्यानचा तिचा हा व्हिडीओ आहे. तसे तर नेहमीच दिशा पटानी आपल्या बोल्ड लुकने चाहत्यांना घायाळ करायची. तिच्या लुकवर फिदा होणाऱ्या फॅन्सची संख्या देखील बरीच मोठी होती. मात्र आता तिचा जो नवा चेहरा समोर आला आहे, तो पाहताच चाहत्यांना मात्र आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे दिशा पटानी चा हा लुक तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिशा च्या लुकमध्ये प्रचंड फरक जाणवत आहे. त्यामुळे नेमकं तिने केलं तरी काय बुवा….हे माहीत करून घेण्यासाठी सगळेजण चिंतेत आहेत. दिशाने आपल्या नाकाची सर्जरी केली आहे, याच सर्जरीने तिच्या नाकात भयंकर बदल झालेला पाहायला मिळतो. म्हणून तर दिशा आता पूर्वीसारखी दिसत नाही. इतकंच नव्हे तर तिला ओळखणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. म्हणून तर सोशल मीडियावर चाहते तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
अभिनेत्री दिशा पटानी चा हा लुक पाहून काहीजण तिला “जशी होती, तशीच सुंदर होतीस गं…आणखी सुंदर दिसण्याच्या नादात पुरती वाट लावून घेतली” असे म्हणत बर्याच कमेंट्स करत आहेत. यावरून समजते की, दिशाचा हा लुक तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही.
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर आगामी काळात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिशा रसिकांच्या भेटीला येणार आहे. “एक व्हिलन रिटर्न्स” हा सिनेमा 28 जूलै 2022 मध्ये रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे हा अॅक्शन थ्रिलर पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.