दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर येणार चित्रपट, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद मोदींची भूमिका…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर सिनेमा बनवण्यात आला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या बोयपिकचं नाव होतं.

Modi 1200 2

Advertisement

अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदी यांची मुख्य भूमिका साकारली होती.  या चित्रपटाचे शुटिंग अहमदाबाद येथे करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘इंडिया इन माय वेन्स’ नावाच्या बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक असणार आहेत. गेल्या २७ वर्षांपासून सुभाष मलिक चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट बनतो म्हटल्यावर यांत कुणाच्या भूमिका असणार, कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार याची उत्सुकता वाढू लागली आहे.

See also  अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी या कारणामुळे घेतला घटस्फो'ट, खरं कारण आलं समोर...
Advertisement

vvko1 1558849041

कॅप्टन राज माथूर नरेंद्र मोदींची मुख्य भूमिका साकारताना झळकणार आहेत. याशिवाय रझा मुराद, अभिनेता बिंदू दारा सिंह, शाहबाज खान या कलाकारांच्या सिनेमात भूमिका आहेत.  या सिनेमाचं बहुतांशी शूटिंगहे अयोध्येत केलं जाणार आहे. याशिवाय यूपी, हरियाणा, पंजाबमध्येही या सिनेमाच्या काही भागांचे शूटिंग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. कारण पुढील सहा महिन्यांच्या आत सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्मांत्याचं मानस आहे.

Advertisement

मात्र मोदींच्या जीवनात मोलाचं योगदान असणारी व्यक्ती म्हणजे त्यांच्या आईची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकताही वाढली आहे तसेच मोदींची पत्नी जसोदाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री सााकरणार याबाबतची माहिती समोर आली नसून गुलदस्त्यातच आहे.

See also  अभिनेत्री रेखाने केला मोठा खुलासा, म्हणाली, "सुहागरात बकवास आहे, लग्ना अगोदर से'क्स करण्यात..."

1602310830 modi640

Advertisement

हा बायोपिक नरेंद्र मोदींच्या २०१४ सालापासून पुढील आयुष्यावर अधारित असणार आहे. बायोपिकमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेली विकासकामं दाखवली जातील. गेल्या काही महिन्यांपासून या बायोपिकवर काम सुरू होतं. पण २९ मार्च २०२१ चा मुहर्त ठरला असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.

या शिवाय, आता महाभारत या मालिकेत युधिष्ठीर साकारणारे अभिनेता गजेंद्र चौहान हे सुद्धा मोदींच्या रुपानं सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘एक और नरेन’ असं आहे. गजेंद्र चौहान यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. या चित्रपटात नरेंद्र मोदी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांबद्दल सांगितलं जाणार आहे.

Advertisement
See also  'साथ निभाना साथिया' मधील गोपी बहू पडलीये या बॉलीवूड सिंगरच्या प्रेमात, बॉयफ्रेंड नाव ऐकून थक्क व्हाल!

Prime Minister Modi official portrait %28cropped%29 %282%29

या चित्रपटाची निर्मिती दोन भागांमध्ये केली जाणार आहे. एका भागात स्वामी विवेकानंद यांचं कार्य दाखवलं जाणार तर दुसऱ्या भागात मोदी कशाप्रकारे विवेकानंदांच्या विचारांचं अनुकरण करतात याबाबत सांगितलं जाईल. गजेंद्र चौहान या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणार आहेत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close