4 लाखाचा चहा आणि 40 लाखाची लिपस्टिक, अश्या प्रकारे करतात नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो भारतात अनेक श्रीमंत लोक निवास करतात, त्यांच्या महागड्या गाड्या आणि बंगले पाहून सामान्य लोक नेहमीच थक्क होतात. मात्र श्रीमंतीचे आणखीन एक नाव कोणते असेल तर ते अंबानी आहे. देशभर आणि जगभर त्यांची खूप मोठी ओळख आहे. आजवर त्यांनी प्रचंड पैसा कमावला आहे, त्यामुळे त्यांच्या श्रीमंतीची ख्याती जगभर गायली जाते. अनेकजण त्यांच्या लाईफ स्टाईल बद्दल जाणून घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात, सोशल मीडियावर देखील त्यांच्या बद्दल सर्वत्र भरपूर चर्चा सुरू असते. त्यांचे बंगले आणि महागड्या गाड्या खूप आकर्षित करतात.

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी त्यांच्या लाईफ स्टाईल मुळे प्रचंड चर्चेत येत असतात. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. तसेच भारतातील सर्वात जास्त श्रीमंत महिला म्हणून नीता अंबानी यांची ओळख आहे. नीता अंबानी यांना लग्जरी लाईफ जगायला खूप आवडते. त्या नेहमी महागड्या गाडीतून फिरतात, महागडे ड्रेस घालतात. अनेक महागड्या वस्तूंचा त्यांना शॉक आहे, त्यांच्या दिवसाची सुरुवात देखील अत्यंत सुंदर असते. कोणी सामान्य माणूस असेल तर त्याला नेहमीच त्यांच्या दिवसाची सुरुवात पाहून हेवा वाटेल.

See also  तान्हाजी चित्रपटात दिग्दर्शकाला जोकर दाखवायचे होते, पण मला काही तरी वेगळं दाखवायचे होते, सैफ अली खान ने केला खुलासा

सकाळी सकाळी एखादा सामान्य माणूस चहा पित असेल तर तो एका कपसाठी १० ते १५ रुपये खर्च करतो. एक कप चहा मूड अगदी फ्रेश करून टाकतो, शिवाय कामाला नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करता येते. पण नीता अंबानी एक अशी महिला आहे जी असा चहा पिते ज्याचा आपण विचार देखील दुरदूरवर करू शकत नाही. नीता अंबानी ज्या कप मध्ये चहा पिते त्याची किंमत जवळजवळ ३ लाख इतकी आहे. इतका महागडा कप पाहून कोणीही थक्क होऊन जाईल. कोणत्याही सामान्य माणसाला ही माहिती वाचून आश्चर्यच वाटेल.

नीता अंबानी ज्या कप मध्ये चहा पिते तो कप जपानचा सर्वात जुना क्रोकरी ब्रँड नेरिटीक कप आहे. ही नेरिटीक क्रोकरी ५० पीसच्या सेट मध्ये येते. मित्रहो या कपाला चक्क सोन्याची किनार असून त्याची किंमत दीड करोड असते. दरम्यान या एका कपाची किंमत ३ लाख इतकी असते. इतक्या महागड्या कपातून नीता अंबानी रोज सकाळी चहा घेते. त्यांना लग्जरीयस हँडबॅग देखील खूप आवडतात. त्यांच्या कडे अनेक महागड्या बॅगचे कलेक्शन आहे, खूपशा बॅग असल्यामुळे त्या नेहमी वेगवेगळ्या ड्रेस वर शोभेल अशी बॅग घेऊन येत असतात.

See also  मोठा निर्णय: आता ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल

बॅग तर त्यांना आवडतातच शिवाय त्यांना अनेक प्रकारच्या महागड्या चपला देखील आवडतात. प्रत्येक पेहराव्यावर नवीन आणि आकर्षक चप्पल त्या परिधान करतात. त्यांच्या हातात असलेली घड्याळ देखील काही सामान्य नाही, त्यांच्या अनेक महागड्या कंपनीचे घड्याळ आहेत. यांची किंमत जवळपास २ लाखांपासून सुरू होते. मित्रहो त्यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ऐकताना आपल्या भुवया उंचच राहतील. त्यांना असेच आयुष्य मिळत राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment