फिल्मी स्टाईल नाटक करून, गंभीर गुन्ह्यातील 4 आरोपी माढा जेलमधून पळाले, जाणून घ्या कशी घडली घटना?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सोलापूर: कैदी जेलमधून पळल्याच्या अनेक बातम्या येत असतात. बर्‍याच वेळा एकदम फिल्मी स्टाईल अभिनय करत जेलमधून पळून जातात. अशीच एक घटना माढा सबजेलमध्ये घडली आहे.

सोलापुरातील माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यांचा आरोप असणार्‍या 4 आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली आहे. त्यांना पकडण्यासाठी अनेक पोलिस पथके रवाना झाली आहेत. शहरातून बाहेर जाणार्‍या सर्व मार्गावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

अकबर पवार, सिद्धेश्वर कैचे, आकाश उर्फ रॉकी भालेकर आणि तानाजी लोकरे हे पळून गेलेल्या आरोपींचे नावं आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. अकबर पवार हा बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता, तर सिद्धेश्वर कैचे बनावट चलनी नोटा प्रकरणात कोठडीत होता. तसेच आकाश भालेकरवर खुनाचा आरोप आणि आरोपी तानाजी लोकरे पॉक्सो कायद्या अंतर्गत कोठडीत होता.

See also  दिलासदायक: ‘या’ भागात वीजबिल वसूल न करण्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचे आदेश

घटना नेमकी कशी घडली?

प्राप्त माहितीनुसार, या चार आरोपींनी जेल मधून पळून जाण्यासाठी एखाद्या चित्रपटातील कथेला साजेल असा प्लॅन बनवला. तर झालं असं की, कैदी अकबर पवार याने फिट आल्याचे नाटक केले. त्याला यापूर्वीही दोन वेळा फिट आली होती. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना फिट आल्याचे खरे वाटले. अकबर पवारला माढयातील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी जेलचा दरवाजा उघडला. तेव्हा संधी साधत या चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment