अबबss! तब्बल ७००० किलोंची विश्वविक्रमी पुणेरी महामिसळ, सुप्रसिद्ध मराठी शेफ विष्णू मनोहरांची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी?

होय मित्रांनो!, अस्सल महाराष्ट्रीयन खवय्यांची प्रथम पसंती असणारी मिसळ, आणि ती सुद्धा चक्क ७००० किलो. भारतीय खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या विक्रमाला गवसणी घालणारे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पुन्हा एकदा नवीन विश्वविक्रम रचला आहे.

सुप्रसिद्ध मराठी शेफ श्री. विष्णू मनोहर यांनी नुकताच गेल्या रविवारी हा विश्वविक्रमी प्रयत्न पार पाडतांना ७ तासांत तयार केलीय १२०० किलो फरसाणासह ७००० किलो पुणेरी मिसळ. आणि अवघ्या ३ तासांत तब्बल ३०००० गरजू लोकांना केले वाटप. महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ ला पहाटे ३ वाजेपासून महामिसळ तयार करण्यास प्रारंभ झाला होता. एका मोठ्या कढईत ही मिसळ तयार केली गेली.

thebridgechronicle%2F2021 03%2F1bf55ac1 d52a 40b4 aa17

पुणेकर हे पुणेरी पाट्यांपासून ते पुणेरी खाद्यपदार्थांपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेरी मिसळ आपल्या खास चमचमीत चवीसाठी ओळखले जाते. हीच ओळख आता वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी  मास्टर शेफ विष्णू मनोहर पुढे आले आहेत. पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात रविवारी (१४ मार्च) तब्बल सात टन महामिसळ तयार करण्यात आली.

READ  या मंदिरात देवीचा अभिषेक होतो चक्क शाईने, कारण ऐकून थक्क व्हाल!

जगात पहिल्यांदाच ‘सूर्यदत्ता-विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१’ अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ तयार करण्यात आल्याचा दावा संयोजकांकडून करण्यात आला आहे. शेफ विष्णू मनोहर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही महामिसळ तयार करण्यात आली. रविवारी पहाटे दोन ते सकाळी नऊ या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली, तर सकाळी नऊ ते दुपारी १२ या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. ३० हजार गरजूंना या मिसळीचं वाटप करण्यात आलं.

WhatsApp Image 2021 03 14 at 8.42.46 PM

या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, ५०० किलो कांदा, १२५ किलो आले, १२५ किलो लसूण, ४०० किलो तेल, १८० किलो कांदा-लसूण मसाला, ५० किलो मिरची पावडर, ५० किलो हळद, २५ किलो मीठ, ११५ किलो खोबरे, १५ किलो तेज पान, १२०० किलो मिक्स फरसाण, ४५०० लिटर पाणी, ५० किलो कोथिंबीर वापरण्यात आली. मिसळ तयार करण्यासाठी ३३ बाय २२चे चुल्हण, १० बाय १० व ७ बाय ७ साइजची कढई वापरण्यात आली.

READ  आरोपी कर्ज बुडवून लंडनलाच का पळतात तुम्हाला माहीत आहे का?

विश्वविक्रमाची नोंद होण्यासाठी जगातील सर्व बुक ऑफ रेकॉर्ड्‌‌सकडे या विक्रमाची माहिती पाठवली जाणार आहे. मास्टर शेफ विष्णू मनोहर म्हणाले, “हा खूप चांगला अनुभव होता. ही सर्व मिसळ आम्ही चुलीवर तयार केली. याला सर्व कॉलेजच्या तरुणांचा प्रतिसाद मिळाला. आधीचे वर्ल्ड रेकॉर्ड हजारो लोक आजूबाजूला असताना झालेत. मात्र, हा रेकॉर्ड वेगळा आहे. कोविड असल्याने आजूबाजूला केवळ २०-२५ लोक होती. तेवढ्याच लोकांच्या समोर ही मिसळ तयार करण्यात आली.” ७००० किलो मिसळीची पुण्यासह सगळीकडेच चर्चा रंगली होती. फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

IMG 20210315 WA0025 min

शेफ विष्णू मनोहर यांनी  याआधी देशभरात अनेक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. सर्वात मोठं पराठा, ५००० किलोची खिचडी, कबाब अश्या विक्रमानंतर आज शेफ विष्णू मनोहरच्या माध्यमातून तब्बल ७ हजार किलोची महा मिसळ तयार करण्यात आली आहे. यावेळीही त्यांनी माध्यमांशी बोलताना कोणत्या मिसळीची निवड केली, मिसळ वाटपाचे व्यवस्थापन, एकून जिन्नस किती प्रमाणात लागले याबाबत सविस्तर माहिती दिली.

READ  काय खरंच, श्री कृष्णाची 'द्वारकानगरी' गुजरातच्या समुद्रात सापडली आहे? जाणून घ्या सत्य!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment