बदलण्यात आले 8 राज्यांचे राज्यपाल, ‘अशी’ आहे नवीन राज्यपालांची यादी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नवी दिल्ली: देशभरातील 8 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून, त्यांच्या ठिकाणी नवीन 8 राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार आठ राज्यांत नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत किंवा फेरबदल करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुजरात येथील भाजपा नेते मंगूभाई छगनभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे नवे राज्यपाल आणि गोव्यातील भाजपा नेते  व विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.

See also  'या मंत्र्यांनी माझे लैं'गिक शो'षण केले', या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला गंभीर आ'रोप, पुरावे देखील केले सादर...

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी मिझोरमचे राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशातील भाजप नेते डॉ. हरि बाबू कंभमपती यांची नियुक्ती केली आहे. मिझोरमचे राज्यपाल पी.एस. पिल्लई यांची बदली झाली असून त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची बदली झाली असून त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनाच्या प्रसिद्धीपत्रानुसार हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रात सांगितले आहे की, राज्यपालांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून वरील नियुक्त्या प्रभावी होतील.

See also  फक्त कोरोनावर लक्ष केंद्रीत करण्याच्या नादात ‘या’ घातक रोगांकडे दुर्लक्ष न करण्याचे तज्ञांचे आवाहन, ठरू शकतात अतिशय धोकादायक
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment