90 च्या दशकातील या सुपरहिट अभिनेत्री आज जगत आहेत असे जीवन, ही मराठी अभिनेत्री तर…

कला हे एक असं क्षेत्र आहे, की जिथं सतत संघर्ष करावा लागतो. खडतर संघर्षातून वाट शोधावी लागते. प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळतं. या उक्तीप्रमाणे कितीतरी अभिनेते-अभिनेत्री असे आहेत, की ज्यांनी खडतर संघर्ष करून यश मिळवलं आणि ते टिकवलं सुद्धा. पण काही असे ही आहेत, की ज्यांनी सुरुवातीला यश मिळवलं आणि ते थाटात मिरवलं; पण आयुष्याच्या यशस्वी वाटेत टिकवता आलं नाही. आज ते कुठे आहेत याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही.

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, की ज्यांनी त्यांचा सुरुवातीचा काळ गाजवला खरा; पण आज मात्र त्या काय करतात.? हे अनेकांना माहित नसेल. तर चला मग, जाणून घेऊयात त्यापैकी पाच अभिनेत्री कोणत्या..?

ममता कुलकर्णी: 20 एप्रिल 1972 मध्ये महाराष्ट्राच्या मराठी कुटुंबात जन्मलेली एक अभिनेत्री, जी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं नाणं सुरुवातीला खणखणीत वाजवते. त्या अभीनेत्रीचं नाव आहे, ममता कुलकर्णी. होय, जन्म मराठीत झाला असला, भाषा जरी मराठी असली, तरी तिची कारकीर्द मात्र हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्थिरावलेली होती.

क्रांतिवीर, करण-अर्जुन, सबसे बडा खिलाडी, घातक अशा, सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलेले आहे.तिला यश मिळालं. प्रसिद्ध झाली. पण हळूहळू यशाच्या वाटेवर अहंकार आला. मग मद्यपानाच्या आहारी गेली. आणि शेवटी जे घडायला नको होतं तेच घडलं. तिचा संबंध अं’ड’र’व’र्ल्डशी जोडला गेला. आणि हेच कारण ठरलं, ज्यामुळे हिंदी चित्रपटसुष्टी मध्ये तिची पायघसरण झाली.

null

नगमा मुरारजी: सुपरस्टार अभिनेता सलमान खान, अभिनीत “बागी” या सिनेमातून पदार्पण करणारी, नगमा ही एक अशी अभिनेत्री होती, कि जिला एकूण नऊ भाषांच ज्ञान होतं. 25 डिसेंबर 1974 रोजी तिचा जन्म मुंबईत झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. मोठेपणी अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं, असं तिनं ठरवलं होतं.

तसं तिनं बागी मधून सिने क्षेत्राला सुरुवात केली; पण “बागी” सिनेमा नंतर तिला काही खास यश मिळाले नाही. त्यांनतर मात्र तिने सिनेमात काम करणं सोडून दिलं. आणि आता ती राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

null

शिल्पा शिरोडकर: वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, ऐन तारुण्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री, शिल्पा शिरोडकर ही मराठी सिनेमात काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री गंगुबाई (वनिता शिरोडकर) ची मुलगी आहे. तिचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी मुंबई मध्ये झाला.

शिल्पा शिरोडकर उत्तम अभिनय करायची; पण तिला हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये मात्र पाय जमवता आले नाही. नंतर तिने, अपरेश रणजीत सोबत विवाह केला. आणि कुटुंबासोबत इंग्लंडला गेली.

अश्विनी भावे: 7 मे 1972 मध्ये जन्मलेली अभिनेत्री, अश्विनी भावे यांनी 1991 साली हिंदी सिनेमा सृष्टीत पदार्पण केलं. तसं पाहिलं, तर चित्रपटसृष्टीमध्ये मराठीतून त्यांचे पदार्पण झालंच होतं. मराठीमध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने अभिनय करणारी, सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख झाली होती. पण मराठीतली ओळख हिंदी मध्ये मात्र टिकवता आली नाही.

नंतर त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर गोपाळडिकर यांच्याशी विवाह केला. आणि वैवाहिक जीवनात व्यस्त झाल्या. सध्या त्या कुटुंबासोबत परदेशात आहेत.

नीलम कोठारी: 90 सालाच्या सर्व आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम करणारी अभिनेत्री कोण.? असं कोणी नाव जरी विचारलं, तर ते म्हणजे नीलम कोठारी. त्यात तिनं गोविंदा सोबत तब्बल १० सिनेमे केले. ज्यामध्ये ६ सुपरहिट ठरले, तर बाकीचे फ्लॉप. त्यानंतर मात्र तिचे सिनेमे चालले नाही.

अपयश यायला लागलं की माणूस निराशावादी होतो. आणि जे करत होतो ते थांबवतो.त्यांचही अगदी तसंच झालं, नीलम कोठारी यांनी अभिनय क्षेत्रातून माघार घेतली. आणि मग त्यांनी विवाह केला. काही कारणास्तव तो टिकला नाही. पुढे दुसरा विवाह केला; पण तोही काही कारणास्तव फार दिवस टिकला नाही.आणि नंतर तिसरा विवाह केला तो समीर सोनी यांच्यासोबत. आता मात्र नीलम कोठारी या वैवाहिक जीवन सुखी समाधानाने जगत आहे.

Leave a Comment