महाकाल मंदिराच्या खोदकामाच्या वेळी झाला हा चमत्कार, मिळाले विशाल शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या परीसरात विस्तारीकरणासाठी खोदकाम सध्या सुरू आहे. यादरम्यान मंगळवारच्या दिवशी एक भव्यदिव्य शिवलिंग आणि विष्णुची मूर्ती तेथे मिळाली. या शिवलिंग मूर्तीला सर्वप्रथम तेथील कामगारांनी पाहिले. त्यानंतर याची माहिती समितीला देण्यात आली. मंदिर समिती तर्फे पुरातत्व विभागाला सूचित करण्यात आले होते.

vishnu 0

बुधवारी सकाळी पुरातत्व विभागाची एक टीम तेथे पोहोचली व त्यांनी तपास सुरू केला. पुरातत्व विभागाच्या विशेषतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जलाधारी शिवलिंग खूप पुरातन काळातील आहे. भगवान विष्णूंची ही मूर्ती भरपूर जुनी आहे. पुरातत्व विभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीतच त्या शिवलिंग मूर्तीला बाहेर काढण्यात आले.

shive

पुरातत्व विभागाचे अधिकारी ङॉक्टर देवेंद्र सिंह जोधा यांनी सांगितले की, ही जलाधारी शिवलिंगाची मूर्ती 9 व्या आणि 10 व्या दशकातील आहे. तपास प्रकियेनंतर याच्याशी संबंधित प्राचीन माहितीचा शोध घेतला जाईल. तुम्हांला ठाऊक आहे का, याआधी सुद्धा खोदकाम करण्याच्या वेळी शुंग काल आणि परमार कालीन मूर्त्यांचे अवशेष सापडले होते. परंतु हे शिवलिंग मात्र जमिनीपासून 2 फूट अंतरावर भेटले आहे.

See also  कोणत्या राशी इंटरनेटवर काय सर्च करतात? जाणून घ्या, प्रत्येक राशीच्या स्वभावानुसार त्या राशींच्या लोकांना काय पाहायला आवडते?

wsde 1

असे तर शिवलिंगाचे तीन भाग असतात. सर्वांत खालील भाग म्हणजे ब्रह्मा भाग, त्याच्या वरील विष्णु भाग आणि सर्वात वरील भाग म्हणजे शिव भाग. या सापडलेल्या शिवलिंगामध्ये शिव भाग खंडित झाला आहे, तर अन्य दोन भाग सुरक्षित आहेत.

idol

खोदकामाच्या दरम्यान गुप्तकाळातील विटा देखील मिळाल्या होत्या. ज्या पाचव्या- सहाव्या दशकातील असल्याचे म्हटले जाते. पुरातत्व अधिकाऱ्याने सांगितले की, प्राचीन काळात सुद्धा येथे शिवमंदिर अवश्य असणार. म्हणून तर येथे खोदकामाच्या दरम्यान शिव परिवार आणि शिव खङङ्यात मूर्ती मिळाल्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment