वाराणसीच्या गल्ली गल्लीत समाजाच्या सेवेत “बाईक एम्बूलंस” घेऊन फिरतो हा युवक, देतो फ्री सेवा कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जीवनाच्या वाटेवर, कधी ना कधीतरी अशी वेळ येते, की संकटं चारही बाजूंनी घेरतात. सुख हिरावून घेऊन दु:ख पेरतात. तेव्हा गरज असते, कुणाकडून तरी मदतीच्या हातभाराची. आणि अश्या वेळेस, जो ‘ माणसातला देव ’ बनून धावुन येतो, तोच खरा आपल्या आयुष्याचा ‘ देवमाणूस ’ असतो. किंवा हितचिंतक. स्वतःचं हित दुसऱ्याच्या हितात बघणारा. असे लोकं आपल्याला खूपच कमी भेटतात. आज आपण अश्याच एका धाडसी आणि कर्तुत्वान तरुणाच्या संघर्षमय खडतर वाटेची माहिती घेणार आहोत. ज्याने स्वतःचं जीवनच समाजहितासाठी अर्पण केलेलं आहे.

मागील काही वर्षांपासून वाराणसीचा एक तरुण निस्वार्थी भावनेनं अडल्या नडलेल्यांच्या मदतीला धावून जात आहे. गरजूवंतांची सेवा करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा करत आहे. त्या समाजसेवेकऱ्याचं नाव आहे, “ अमन यादव ”…

Advertisement

को’रो’ना काळात आपल्या निदर्शनास आलं असेल, की कितीतरी पेशंट ए’म’बु’लां’न्स न मिळाल्या कारणाने मृ’त पावलेले आहेत. अश्याच जो’ख’मी कारणांमुळे कुणाकडूनही कश्याची अपेक्षा न धरता ‘ अमन यादव ’ याने एक शक्कल लढवली. स्वतःच्या बाईकलाच एमबुलांन्स करून टाकली. वाराणसी मध्ये आज कधीही, कुणीही अडचणीत आलं तर तो क्षणात त्यांच्या सेवेत हजर होतो. त्यांना हॉ’स्पि’ट’लला पोहचवतो. ज्यामध्ये मग दिवस पाहिला जात नाही की रात्र. त्याने आत्तापर्यंत हजारो रु’ग्णांना बाईक ए’म’बु’लां’न्सची सेवा दिलेली आहे. इतकच नव्हे तर यासोबत हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी सोडवण्यास तो मदत करतो. त्याचं हे काम खरच समाजहितवादी आणि उल्लेखनीय आहे.

See also  नवरात्रीमध्ये श्री दुर्गामातेच्या या ९ रूपांची आराधना होते, जाणून घ्या कोणती आहेत ९ रूपे, कोणत्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना नवदुर्गा म्हणतात...

ज्याला ठेच लागलेली असते, त्यालाच त्रासाची किंमत माहित असते. एके दिवशी अमन असाच कामानिमित सरकारी हॉ’स्पि’ट’लमध्ये गेला होता. तेव्हा तिथली परिस्थिती पाहून त्याचं मन खूप अस्वस्थ झालं. कारण तिथल्या रु’ग्णांची विचारपूस करणारा कुणीही नव्हता. रुग्णांची स्थिती जनावरांपेक्षा बेहत्तर झालेली होती. बाहेर तर एक महिला बे’शु’द्धावस्थेत होती. आसपास विचारपूस केल्यावर मला त्यांच्या मुलांचा नंबर मिळाला खरं; पण ५ मुलांपैकी कुणीच तिच्यावर उपचार करून, घरी घेऊन जायला तयार नव्हता.

Advertisement

मन खूप दु’खी झालं होतं. रक्त जेव्हा दुसऱ्या रक्ताला ओळखण्यास नकार देतं, तेव्हा काय करायचं ? तेव्हा शेवटी मीच त्या म्हाताऱ्या महिलेच्या उपचाराची आणि आयुष्याची जवाबदारी घेतली. पण तिला वाचवू शकलो नाही. पो’स्ट’मो’र्टम झाल्यानंतर तर खूप अविश्वसनीय गोष्ट घडली. त्या म्हाताऱ्या महिलेच्या हातातली अंगठी आणि सोन्याची चैन घ्यायला तिचे मुले आली. म्हणजे बघा, किती स्वार्थी झालोत आपण ? त्याचं वेळी मी ठरवलं, की आता गरजूवंत, आणि निराधारांच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचं. आणि तेच आता मी करत आहे.

See also  यंदा वर्षभरात फक्त एकदाच आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, विधी शुभाशुभ योग इ. सविस्तर...

२०१३ मध्ये जेव्हा त्याने या कार्याची सुरुवात केली, तेव्हा तो पायी चालून लोकांची मदत करायचा. त्याने कधी उपाशी असलेल्याची भूक भागवली तर कधी मलमपट्टी केली. एवढचं नव्हे तर एखाद्याला रक्ताची गरज असेल तर त्याचीही व्यवस्था अमन करायचा. जेव्हा साऱ्या वाराणसीत अमनचं कार्य पोहचलं, तेव्हा अनेकांनी त्याला आर्थिक, मानसिक पाठबळ आणि एका शहरातल्या उद्योजकाकडून मोटारसायकलची मदत झाली.

Advertisement

त्याने या मोटारसायकलचा खूप सकारात्मक उपयोग सुरु केला. मोटारसायकलला त्याने एमबुलान्सचं रूप दिलं. हे खूप प्रशंसनीय आहे. जसा १०८ नंबर लावल्यावर शासकीय एमबुलांन्स सेवेत येते. कधी कधी तर येतच नाही. तो मुद्दा वेगळा आहे; पण अमनचा नंबर सुद्धा लावला की जिथं बोलतील तिथं मोटारसायकल ए’म’बु’लां’न्स हजर होते.

See also  यंदा अश्या प्रकारे साजरे करा तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त, आख्यायिका, शास्त्रीय महत्व, विवाह विधी...

या को’रो’ना काळात तर माणुसकीची अनेकांना खरी किंमत कळली. १०० मधील ७० टक्क्यांनी मदत सोडा तर संबंधचं तोडून टाकला. कारण सगळेच या म’हा’मा’रीने घा’ब’रू’न गेले होते. अजूनही आहेतच. साहजिकच, परिस्थितीही तशीच आहे म्हणा. पण याचं काळात अमन मात्र मागे हटला नाही. त्याने अनेकांची हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स यांच्यासारखीचं सेवा केली.

Advertisement

अमन यादव हा वाराणसी मध्ये “ कबीर ” म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला तिथल्या लोकांनीच हे नाव दिलं आहे. इतरांच्या सेवेत आपला आनंद असतो, असं सांगून खरं करून दाखवणाऱ्या अमन कबीरला टीम अमुक तमुकचा कडक सलाम !…

Advertisement

Leave a Comment

close