भिकारी समजून शोरूमच्या बाहेर काढले, नंतर त्याच व्यक्तीने खरेदी केली 12 लाखाची बाईक, नंतर जे घडले…

मित्रांनो, बरेचदा आपण पाहतो की, एखाद्या व्यक्तीच्या राहणीमानावरून त्यांची कुवत किंवा प्रोफेशन ठरवले जाते. परंतु अनेकदा असे होते की, एखादी व्यक्ती तिच्या पेहरावाने अगदीच साधीसुधी असते. परंतु त्या व्यक्तीची कुवत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा बाहेर असते. आज आम्ही तुम्हांला अशाच एका व्यक्ती विषयी सांगणार आहोत, जे समजल्यावर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

थायलंड मध्ये एका वृद्ध व्यक्ती सोबत हा प्रकार घडला आहे. ही वृद्ध व्यक्ती एका बाइकच्या शोरूम बाहेर उभी राहून सर्व बाईकस् चे अत्यंत बारकाईने निरीक्षण करत होती. परंतु जेव्हा या व्यक्तीने शोरूमच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भिकारी म्हणून हकलवून लावले. परंतु त्याच माणसाने शेवटी त्याच शोरूम मधून 12 लाख रुपयांची नवी कोरी करकरीत बाईक खरेदी केली.

READ  'आपली आजी' या तुफान लोकप्रिय फूड चॅनलच्या या आजी नेमक्या आहेत तरी कोण? यूट्यूब वरून कमावतात लाखो रुपये...

bike1

थायलंडच्या लुंग ङेचा नावाच्या एका वृद्धाचे सोशल मीडियावर सध्या खूप जास्तीत जास्त फोटोज् वायरल होत आहेत. यामध्ये तो एका भिकारी आणि गरीब व्यक्ती प्रमाणे दिसत आहे. परंतु गंमतीदार गोष्ट तर ही आहे की, शेवटी याच भिकारी सारख्या दिसणाऱ्या माणसाने 12 लाख रुपयांची कॅश देऊन महागडी ङेविङसन बाईक विकत घेतली.

लुंग याचा अवतार अगदी विस्कटलेला आणि गरीबासारखा दिसत असल्याने शोरूम मधील कर्मचाऱ्यांना तो भिकारी आहे, असे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. परंतु शोरूम मधील बाईकस् चे बारकाईने निरीक्षण करून झाल्यानंतर तो 15- 20 मिनिटांनी शोरूम मध्ये जाऊ लागला.

bike2 e1493943921371

व त्याने तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले की, मला बाईक घ्यायची आहे. तेथील सेल्स पर्सन ने जेव्हा लुंगला पाहिले तेव्हा त्याने ओळखले की, हा माणूस इतक्या सहजासहजी इथून जाणार नाही. म्हणून तो कङक शब्दांत लुंग ला ओरडला व त्याला तेथून बाहेर जाण्यास सांगितले.

READ  हिंदी चित्रपटांमध्ये साइड रोल करत प्रसिद्ध झाला होता हा अभिनेता, पण...

लुंग मात्र काही केल्या त्यांचे मुळीच ऐकत नव्हता. त्याने शोरूमच्या मॅनेजरला भेटायची आपली इच्छा व्यक्त केली. लुंग च्या हातात एक बॅग देखील होती. पाहता- पाहता काही वेळांतच त्याला तेथील सर्व लोकांनी घेरलं. तेथील सगळे लोक लुंग ला एक भिकारी किंवा नोकर माणूस समजत होते. परंतु जेव्हा त्याने मला बाईक घ्यायची आहे, असे म्हटले तेव्हा मात्र सगळे त्याची खिल्ली उडवत हसू लागले. तेव्हा त्या सर्वांना असे हसताना पाहून लुंग त्यांच्यावर ओरडून म्हणाला की, मला मॅनेजरला भेटायचे आहे.

bike3 e1493943930352

या सर्व गोंधळामुळे त्या शोरूमचे मालक बाहेर आले. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. शोरूमच्या मालकांनी लुंगला भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लुंगने ताबडतोब आपल्याला एक बाईक विकत घ्यायची आहे, असे सांगितले.

READ  अमिताभ बच्चन यांची मुलगी या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्याला लिहीत असे पत्र, कारण ऐकून थक्क व्हाल!

तेव्हा त्या मालकाने त्याला ङेविङसन ही 12 लाख किंमतीची नवी कोरी बाईक दाखवली. मग लुंगने देखील 12 लाख रुपयांची रोख रक्कम शोरूमच्या मालकांना देऊन ती बाईक खरेदी केली. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. व त्या सर्वांना आपण लुंग ङेचा सोबत केलेल्या गैरकृत्याचा पश्चाताप झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment