गौतमी देशपांडे हिच्या घरी आला एक नवा पाहुणा, कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे “वेलकम बेबी गर्ल”
झी मराठी वाहिनीवरील “माझा होशील ना” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे. गौतमी ही खूप कमी कालावधीतच चाहत्यांच्या मनात भरली. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची लहान बहीण असलेल्या गौतमीने आपल्या अभिनयाच्या जोरावरच कलाविश्वात स्वतःचं असं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच तर ती आज कित्येक तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिच्या घरी नुकत्याच एका लहान पाहुण्यांचं आगमन झाले आहे. याविषयी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करून तिने ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या घरी आलेल्या एका पाहुण्याची तिने आपल्या चाहत्यांना ओळख करून दिली आहे. त्याचप्रमाणे “वेलकम बेबी गर्ल” असे कॅप्शन सुद्धा तिने या व्हिडिओमध्ये दिले आहे.
यादरम्यान अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये हा नवा पाहुणा म्हणजे कुत्र्याचं एक गोंडस पिल्लू आहे. या व्हिडिओमध्ये तिने त्याची सर्वांना ओळख करून दिली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओ च्या बॅकग्राऊंडला तिने “तारे जमीन पर” या चित्रपटातील गाणं सुद्धा जोडले आहे. त्यामुळे सध्या गौतमी च्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.