पैसे काढण्यासाठी तरुणाकडे मागितली मदत, त्यानंतर महिलेसोबत असे काही घडले की…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

धनबाद: अनोळखी व्यक्तीकडून मदत मागताना सावधानी बाळगली पाहिजे अन्यथा फार महागात पडू शकते. आर्थिक व्यवहार करताना या गोष्टीची फार काळजी घ्यावी लागते. आरबीआय स्वतःच्या एटीएम कार्डचे पिन किंवा बँकेशी निगडीत इतर माहिती कोणालाही सांगू नये यासाठी नेहमी जनजागृती करत असते. आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने बँक ग्राहकांना काळजी घेण्याच्या सूचना करते. मात्र, तरीही काही लोक या सूचना पाळत नाहीत.

झारखंड राज्यातील धनबादमध्ये एका महिलेने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एका तरुणाला मदत मागितली. त्यावेळी त्या तरुणाने त्या महिलेचे एटीएम बदलले. त्याने महिलेचे एटीएम स्वतःजवळ ठेवले. महिला घरी परत गेली तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिच्या पतीच्या मोबाइल वर तिच्या खात्यातून 4,000 रुपये काढल्याचा SMS आला. नंतर महिलेने लगेच बँकेत जाऊन ते एटीएम कार्ड ब्लॉक करवून घेतले. त्यांनी हरीहरपूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासत आहेत.

See also  "कौन बनेगा करोडपती" मधील ही लाईफलाईन होणार रद्द, त्यामागचे कारण ऐकून थक्क व्हाल!

प्राप्त महितीनुसार, पीडित महिलेचे सोनीदेवी गोमो असून, त्या जुन्या बाजारात असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांनी पैसे काढता येत नसल्याने तिथे उपस्थित एका तरुणाला मदत मागितली. त्या तरुणाने महिलेला पैसे काढण्याची प्रक्रिया समजावली. महिलेने 4000 रुपये काढले व पैसे घेऊन घरी गेली. यावेळी त्या तरुणाने महिलेचे कार्ड बदलले होते.

सोनादेवीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पैसे काढून घरी गेल्यानंतर तिच्या पतीच्या मोबाईलवर पुन्हा 4,000 रुपये काढल्याचा मेसेज आला आणि 300 रुपयाचे पेट्रोल भरल्याचा मेसेज आला. पतीने महिलेला या व्यवहाराबद्दल विचारले असता महिला स्तब्ध झाली. तिला याविषयी काहीच माहिती नव्हते. त्रासलेल्या पीडित महिला घाईघाईत बँकेत पोहोचली आणि बँक कर्मचार्‍यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर बँकेने तिचे एटीएम कार्ड लॉक केले.

See also  मृत्युनंतर आत्मा कुठे जातो व त्याचे काय होते, किती दिवसांनंतर तो पुन्हा जन्म घेतो, जाणून घ्या सविस्तर...

यानंतर महिलेने हरिहरपूर पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिस आरोपी तरुणाच्या शोधात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पैसे काढताना महिलेचा पिन नंबर माहित झाला. नंतर त्याने महिलेला बोलण्यात गोंधळवून तिचे एटीएम कार्ड बदलले आणि नंतर पैसे काढून घेतले.

Leave a Comment