संजनाचं आणि अनिरुद्धचे असलेलं प्रकरण कळेल का अरुंधतीला? काय घडलं ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आजच्या भागात..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका जोरदार चालू आहे. ती रसिकांच्या पसंतीस पडत आहे. लॉक डाऊन आधी ती मालिका जास्त प्रभावी होत नव्हती. पण जेव्हा पासुन लॉकडाऊन उघडल आणिनवीन भागाचं शूटिंग सुरु झालं तेव्हा पासून मालिका चांगलीच रंगलेली आहे.

सरकारने दिलेल्या आदेशाने मालिकेचं शूटिंग करण्यात येत आहे. योग्य ती काळजी सुद्धा घेतली जात आहे. या मालिकेत संजना चं पात्र साकारणारी अभिनेत्री सुद्धा बदलली आहे. आता दिपाली भोसले हे पात्र साकारत आहे. तरीही त्याचा काहीच परिणाम मालिकेच्या टीआरपी वर झालेला दिसत नाही आहे.

आई कुठे काय करते या मालिकेच्या कालच्या भागात हॉल मध्ये सगळी माणसं बसलेली असतात. अनिरुद्ध चहा पीत असतो. तर कांचन आज्जी देवपूजा करत असते. आप्पा ही तिथेच पेपर वाचत बसलेले असतात. अरुंधती आप्पांना दुध घेऊन येते. आप्पांना दुध देऊन अरुंधती अनिरुद्धला म्हणते की संजना येणार आहे की नाही.

See also  "ये रिश्ता क्या कहलाता है" मधील या प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका, कारण...

का गं ? नाही म्हणजे अरे तिला जेवणात धरायला. असं बोलून अरुंधती किचन मध्ये निघून जाते. त्यावर अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो की मी विचारतो तिला. सांगतो मग तुला. असं म्हणून तिथून तडक निघून जातो. त्या नंतर यश येतो. अरुंधती त्यालाही कॉफी देते. तेवढयात कॉफी घेताना यश म्हणतो की अभी आज सकाळीच बाहेर गेलेला आहे. अरुंधती त्याला फोन करायला लावते. पण होतं असं की अभिने फोन घरीच ठेवलेला असतो.

इकडे संजना अनिरुद्ध आपल्याशी कसा खोटं बोलला, किती त्रास दिलं याचा विचार करते. अनिरुद्ध ला शंभर वर्षं आयुष्य लाभावं तसं त्याचा संजना ला फोन येतो. तेव्हा फोन उचलून संजना त्याच्यावर भडकते. तू चीटर आहेस. त्यादिवशी मी तुझ्या घरी आले तर तू तुझ्या बायको सोबत नाचत होतास. मी जर आत आले असते. तर सगळे सांगितलं असतं.

See also  'देवमाणूस' मालिकेतील टोण्या खऱ्या आयुष्यात आहे असा, त्याचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...

त्यावर अनिरुद्ध रागाने म्हणतो की ये आत्ता चल. काय राढा घालायचं तो घाल. तुला जे करायचं ते कर. सांग सगळ्यांना आणि होऊदे मलाही यातून कायमचं मोकळं आग वाटलं तू तरी सोबत असशील. पण तुही तशीच निघाली. खरं सांगतो आप्पांना बरं नाहीये. त्यांचा वेळ जावा. त्यांना बरं वाटाव ना म्हणु आम्ही गाणी लावून नाचत होतो. तुला समजून घायचं तर घे नाहीतर येऊन सगळं सांगून जा. म्हंजी दोघेही यातून मोकळे. मग जे होईल ते होईल. असं म्हणून रागात अनिरुद्ध फोन ठेवतो.

यावर अनिरुद्धला माहित असत की हळव्या संजनाचा फोन नक्की येणार लगेच थोडया वेळात तिचा फोन येतो. फोन करून संजना अनिरुद्ध ची माफी मागते. मला समजत नाही रे मला कधी कधी इतका राग का येतो. इट्स ओके. चल बाय.

असं म्हणून अनिरुद्ध फोन ठेवतो. इकडे अरुंधती अभिच्या सुरक्षा साठी देवाकडे पूजा करते. पण तेवढ्यात अभी येतो. म्हणतो की आपण बाबांच्या वाढदिवसाला मोठी पूजा करू. तेवढ्यात अनिरुद्ध तिथं येतो आणि म्हणतो की आपलं ठरलं होतं की असं काही करायचं नाही. अभी म्हणतो की करायचं मला बरं वाटाव म्हणून. आणि अनिरुद्ध अभिला परवानगी देतो.

See also  'तुला पाहते रे' मधील या अभिनेत्रीने केले आहे कौतुकास्पद काम, ऐकून तुम्हालाही गर्व वाटेल...

इकडे गौरी आणि इशा गप्पा मारत असतात. तेव्हा त्या म्हणतात की आई बाबांच्या लगानच्या वाढदिवसाची पूजा करायचं ठरलं आहे. तेव्हा हे ऐकूण संजना खोलीत जाऊन एक फोन लावते. आणि म्हणते की मी लग्नाचा फॉर्म भरला आहे.

आणि मला लग्न करायचं आहे तेही अनिरुद्ध शी. आता हे गौरी ऐकते. आणि इथेच भाग संपतो. आता संजना चं आणि अनिरुद्ध चं प्रकरण गौरीला कळतं. जर अरुंधती ला कळल तर पुढे काय होणार ? म्हणजे हे खूप विचित्र घडणार. मालिका आता नवं वळण घेणार. पुढील माहिती पुढच्या भागात.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment