संजना आणि अनिरुद्धचे लग्न व्हावे असे का वाटत आहे अरुंधतीला? जाणून घ्या काय घडले आजच्या भागात…

.

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर सध्या “ आई कुठे काय करते ” ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. त्यातली कौटुंबिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावत आहे. मालिकेत येणारा नवा रंग चांगलाच रंग चढवत आहे.

या मालिकेत कालच्या भागाच्या शेवटी असं झालं होतं की संजना कडून गौरीला फोनवरून अनिरुद्ध आणि तिचं काहीतरी आहे. आणि दोघेही पार लग्नापर्यंत पोहचले आहेत. हे कळलं होतं आणि आता सगळेच फार अडचणीत येणार होते.

आजच्या भागात अनिरुद्ध आपल्या खोलीत कम्प्युटर वर काम करत असतो. अरुंधती तिचे कपाट आवरत असते. दोघेही गप्प असतात. तेव्हा अरुंधती बोलायला लागते की आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे अभी व सगळ्यांनी ठरवलं आहे.

पण अनिरुद्ध काहीच बोलत नाही. ऐकूण न ऐकल्यासारखे करून तो आपलं काम करण्यात पुन्हा रमून जातो. अरुंधतीला हे अनिरुद्ध चं वागणं पटत नाही. ती त्यावर काही बोलणार तितक्यात तिला संजना चा फोन येतो.

आणि अरुंधती संजनाशी बोलायला लागते. जेव्हा दोघी बोलत असतात हे जेव्हा अनिरुद्ध ला कळतं तेव्हा त्याचा चेहरा पार घाबरतो. फोन ठेवल्या वर लगेच अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो की काय बोलली संजना ? त्यावर अरुंधती म्हणते की तिला काहीतरी महत्वाचं बोलयाचं आहे आणि ती इकडे येणार आहे. त्यावर अनिरुद्ध तिला म्हणतो की केव्हा येणार आहे ? त्यावर अरुंधती म्हणते की तिने हे नाही सांगितलं की ती कधी येणार आहे. व असं बोलून अरुंधती बाहेर निघून जाते. अनिरुद्ध ला काहीच कळत नाही तो असवस्थ होतो.

अनिरुद्ध लगेच मोबाईल घेऊन संजना ला फोन लावतो. पण संजना त्याचा फोन उचलत नाही कट करते. असं दोन तीन वेळा होतं. तेव्हा अनिरुद्ध विचार करायला लागतो की फोन का उचलत नाहीये ? ही काही सांगणार तर नाही ये ना? आणि तिला अरुंधती शी असं काय महत्वाचं बोलायचं आहे. अनिरुद्ध घराबाहेर येऊन संजना ला फोन लावतो पण ती फोन उचलत नाही. अनिरुद्ध तिला फोन का उचलत नाही असा मेसेज करतो. संजना मेसेज पाहते. इकडे अनिरुद्ध औषध आणण्यासाठी कार घेऊन निघतो.

इकडे अभी घरच्यांसोबत आई आणि बाबा म्हणजे अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची प्लानिंग करतात. तेवढ्यात संजना तिथे येते. अरुंधती संजना ला पाहून तिला खुर्चीवर बसायला सांगते. संजना तिला म्हणते की मला तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे. संजना अरुंधतीला सगळं सांगून टाकते. तेवढ्यात अनिरुद्ध औषध घेऊन येतो. वाटेत त्याला अरुंधती आडवी जाते.

अनिरुद्ध लगेच तिला विचारतो की काय सांगितलं संजनाने तुला? त्यावर अरुंधती म्हणते की संजनाला घटस्फोट घ्यायचा आहे. कारण तिचं असं म्हणणं आहे की तिला दुसरं लग्न करायचं आहे. तिच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलेलं आहे. हे ऐकूण अरुंधती आणि अनिरुद्ध दोघेही घाबरे होतात. तिथं संजना येते आणि सांगते की मला तुझ्याकडून निर्णय हवा आहे. तू सांग मी काय करू?

तेव्हा अरुंधती म्हणते की जर तुला समोरचा व्यक्ती कूप प्रेम करत असेल तर तू शेखर भाहुजी कडून घेऊ शकते घटस्फोट. फक्त आनंदी रहा. हे ऐकूण संजना मिस्कील हस्ते. अनिरुद्ध ला काय करावं आणि काय नाही हे कळत नाही. तेवढयात अरुंधतीला कांचन आवाज देते. ती घरात जाते. संजना अनिरुद्ध ला म्हणते की तुझीच बायको सांगते की कर लग्न आता !. पण अनिरुद्ध तिला खवळतो. त्यांचं बोलण चालू असताना एका विशिष्ट टप्प्यावर एपिसोड संपतो. सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की आता पुढे नेमकं होणार काय ?

Leave a Comment