अनिरुद्ध आणि संजना लग्न करतायत! पण मग अरुंधतीचं काय? आई कुठे काय करते या मालिकेत नेमकं काय घडलं आजच्या भागात

.

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर सध्या “ आई कुठे काय करते ” ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस खरी उतरत आहे. सध्याच्या काळात मालिका टीआरपी मध्ये अव्वल नंबर घेत आहे. मालिकेचं असलेलं मनोरंजन भरलेलं कथानक रसिकांना रोज मालिका पाहायला भाग पाडत आहे.

कालच्या भागात शेवट असं घडलं की संजना ने अरुंधती ला सांगितलं की मला घटस्फोट घेऊन दुसऱ्या एकाशी ,लग्न करायचं आहे. हे ऐकुण अरुंधती खूप गरबडते. तेवढ्यात तिला घरातून कांचनचा आवाज येतो. ती निघून जाते. अनिरुद्ध संजना ला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना कालचा भाग संपतो. चला मग पाहूयात की आजच्या भागात नेमकं झालं काय?

अनिरुद्ध च्या घरी सगळे हॉल मध्ये बसलेले आहेत. त्यामध्ये कांचन, अभी , आप्पा आणि इतर मंडळी अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाची काय तयारी करायची याच्यावर विचार करत असतात. तेवढ्यात अभी असं म्हणतो की ऐकाणा, कोविड मुळे आपण वाढदिवसाला फार लोकांना बोलायचं नाही. कारण उगं परत नसताना काही प्रॉब्लेम नको. आपण कमी लोकांनाच बोलवू. तेवढ्यात गुरुजींचा फोन येतो. कांचन गुरुजी सोबत फोनवर बोलते. आणि बोलून झाल्यावर कांचन म्हणते की, पूजेसाठी ७ ऑगस्ट ही तारीख ठरलेली आहे.

इकडे बेडरूम मध्ये अनिरुद्ध येरझरया मारत असतो. अस्वस्थ अनिरुद्ध विचार करतो की या संकटातून कसं बाहेर पडायचं. त्याच्या डोक्यात फक्त अरुंधती आणि संजना चे विचार चालू असतात. तेवढ्यात अभी तिथे येतो आणि अनिरुध ची माफी मागतो. बाबा, माझं खूप चुकलं. मी प्रेमात वेडा झालो होतो. चांगलं वाईट काहीच कळत नव्हतं.

तेव्हा अनिरुद्ध त्यावर बोलतो की बाळा प्रेमात चुका होतात पण त्या लक्षात येत नाहीत. तुला तुझी झालेली चूक लक्षात आली हीच खूप मोठी गोष्ट आहे. प्रेम केलं तरी काही चुकत नाही. फक्त प्रेमाला पहिली प्रायरोटी नसावी. प्रायरेटी फक्त आपल्या करियर, पैसा, जीवन याला द्यावी. त्यावर अभी म्हणतो की बाबा, मला ना तुमच्यासारखं व्हायचं आहे.

अभी आणि अनिरुद्ध त्यावेळी खूप भावूक होतात. बापलेक आठवणीत गुंततात. अभी लहानपणीच्या काही गोष्टी सांगतो. त्यानंतर तो बापाला विनवणी करतो की बाबा, मला खरच माफ करा. इथून पुढे कधीच माझ्याकडून चूक घडणार नाही. तुम्हाला संताप होणार नाही. मुलाच्या बदललेल्या स्वभावामुळे अनिरुद्ध ला बापाच्या नात्याने डोळ्यात अश्रू येतात. तो क्षण खूप भावूक बनुन जातो. मी तुमच्या सारखं होईल क्लियर, फोकस ठेवणारा आणि असं बोलून अभी तिथून निघून जातो.

अभी घराबाहेर येतो. तिथे आप्पा काम करत असतात. अभी त्यांच्यापाशी येतो. त्यांना म्हणतो की तुमच्या मणक्या मध्ये ग्याप आहे. त्यामुळे तुम्ही काही काम करायचं नाही. त्रास करून घ्यायचा नाही. असं बोलून तो बाहेर जायला निघतो. तेव्हा तिथे गौरी येते. आप्पा लगेच घरात निघून जातात.

गौरी अभीला म्हणते की मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायाचं आहे. व ती म्हणते की मी जे काही सांगणार आहे ते सगळं खरं आहे. मी माझ्या कानाने ऐकलं आणि डोळ्याने पाहिलं आहे. तेव्हा अभी तिला जे काही असेल ते लवकर सांग असं म्हणतो. तेव्हा गौरी सांगते की अनिरुद्ध आणि संजना यांचे अफेयर चालू आहे.

तेव्हा अभी आधी तिच्यावर ओरडतो. ते सोबत ऑफिस ला जातात म्हणजे त्यांचे काही असेल हे खोटं आहे. तेव्हा गौरी म्हणते की खरं आहे. आणि ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. हे ऐकूण तर अभी फार चिडतो. तिच्यावर ओरडतो. तिला जायला सांगतो.

तेव्हा गौरी अभिला दोघांचा एक फोटो दाखवते. तो फोटो पाहून अभिला खूप मोठा धक्का बसतो. त्याला काय करावं हे काहीच कळत नाही. अनेक प्रश्न पडतात. आणि इथेच भाग संपतो. आता पुढे काय होतं त्यासाठी आपल्याला उद्याच्या भागापर्यंत थांबावं लागेल.

Leave a Comment