“तिला कसलीच लाज नाही” असे म्हणत ‘आई माझी काळूबाई’ मधून प्राजक्ता गायकवाडला अलका कुबल यांनी दिला डच्चू, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून एक्झिट झाली आहे. ती सध्या छोट्या पडद्यावर आई माझी काळूबाई या मालिकेत काम करत होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, मालिकेतील इतर कलाकार आणि क्रू मेंबर्सने त’क्रा’र केल्यानंतर निर्मात्या अलका कुबल यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आता या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगतापची वर्णी लागणार आहे. प्राजक्ताच्या जागी येणाऱ्या वीणानं यापूर्वी ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ‘मराठी बिग बॉस’मुळेही ती चर्चेत होती.

मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी याबाबत एका प्रथितयश चॅनल आणि प्रिंट मीडियाशी बोलतांना सांगितले की, ‘स्क्रिप्ट १५ दिवस आधी हवं, शूटिंगासाठी इतकेच दिवस देईन या प्राजक्ताच्या अटी होत्या. त्या पूर्ण करणं शक्य नव्हतं. तसंच या सगळ्यात तिच्या आईचा बराच हस्तक्षेप असे.

या सगळ्यामुळे आम्हाला अत्यंत मनस्ताप झालाय. असा त्रास इतर निर्मात्यांना होऊ नये ही इच्छा आहे. शूटिंगासाठी सेटवर उशीरा येणं, शूटिंगासाठी ऐन वेळी नकार देणं, सुट्टीसाठी परीक्षा किंवा अन्य काही कारणं देणं अशा काही गोष्टींवरुन निर्माते आणि अभिनेत्री यांच्यात वा’दाची ठिणगी पडल्याचं कळतं.

वृत्तपत्रांच्या रिपोर्टनुसार अलका कुबल म्हणाल्या, “अनप्रोफेशनल वर्तणूक सगळीकडे असते. काही ठिकाणी ते चालवून घेतले जाते तर काही ठिकाणी त्यावर कारवाई केली जाते. प्राजक्ताच्या उद्धट वर्तणूकीमुळे इतर कलाकारांवर परिणाम होऊ लागला. संपूर्ण युनिट तिच्या गैरवर्तणूकीचा साक्षीदार आहे. प्राजक्ताचे वागणे अनप्रोफेशनल आहे. त्यामुळे आम्ही तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला.

सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे सुरू असायचे. मध्येच डोकं दुखतं म्हणायची, मध्येच शूटिंग थांबवायला सांगायची, मध्येच रडत बसायची. शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण मी तिला समजून घेतलं”, असं त्यांनी सांगितलं. प्राजक्ता दोन, चार तर कधी कधी सहा तास रुममधून बाहेर येत नसल्याची तक्रार अलका यांनी केली. सगळे तिची वाट पाहत बसायचे.

आशालता यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार तिच्यासाठी थांबायचे. तिला कसलीच लाज नाही”, अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे हे तिचं सुरूच असायचं. शूट सुरू झाल्यावर पण तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाइलाजाने रात्री शूट करावं लागायचं. या कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येते, कोणाच्या जिवावर माज करतात”, अशा शब्दांत त्या भडकल्या.

प्राजक्ताला समज देऊन दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. मात्र तरीही तिच्या वागणुकीत काही बदल न झाल्याने तिला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं. वाहिनीकडून, मालिकेतील ज्येष्ठ कलाकारांकडून अनेकदा प्राजक्ताला समज देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. प्राजक्ताचं हेकेखोर वागणं तिच्या अंगाशी आल्याची प्रतिक्रिया अनेकजण सोशल मीडियावर देत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर मीडियाने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडशी संपर्क साधला असता तिनं सांगितलं, ” की, मालिकेचे शूटिंग साताऱ्याला असते. संपूर्ण टीम तिथेच राहते. त्यामुळे सेटवर उशिरा येण्याची त’क्रा’र कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. तसेच मालिका स्वीकारतानाच मी माझ्या परीक्षेबाबत सांगितले होते. पण, ‘आपण शूटिंग करतोय. तुला परीक्षेसाठी जाता येणार नाही’ असं मला सांगण्यात आले. मी परीक्षा देऊ शकले नाही. या सगळ्या वातावरणात काम करणे शक्य नसल्याचे सांगून मी मालिका सोडली.

ती पुढे म्हणाली की, ‘पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड चाचणी केली नसेल, तर त्यांच्याबरोबर प्रवास कसा करायचा, एवढाच माझा मुद्दा होता. त्यासाठी मला शिवीगाळ केली गेली. मला हे अत्यंत चुकीचं वाटलं. तरीही मी दीड महिना शूटिंग केलं. सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर, मालिका चांगली असूनही नाइलाजास्तव ३१ ऑक्टोबरपर्यंतच काम करेन, असं निर्माते आणि वाहिनीला मी सांगितलं.’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment