अभिनेता राजकुमारचा “जानी” दु’श्म’न असलेला हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आज आहे अब्जाधीश, नाव ऐकून थक्क व्हाल!
सर्वांचे लाडके धरम पाजी म्हणजेच धर्मेंद्र यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. धर्मेंद्र हे दिलीपकुमारचा प्रचंड चाहते आहेत पण डायलॉग किंग राजकुमार यांच्याशी मात्र त्यांचे कधीही पटले नाही. चित्रपटांच्या सेट वर अक्षरशः दोघांच्या मध्ये चक्क मा’रा’मा’री सुद्धा झाली आहे.
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी लुधियाना (पंजाब) मधील नसराली गावात झाला. धर्मेंद्रने १९६० मध्ये बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीच्या करमणूक विश्वात पदार्पण केले. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांत संस्मरणीय भूमिका करून आपल्या बलदंड शरीरयष्टीमुळे ही मॅन अशी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, निर्मिती आणि आता अगदी राजकारणातही नशीब आजमावले आहेत. आज धर्मेंद्र 85 वर्षांचा झाले आहेत.
को’रो’ना व्हा’य’र’स सा’थी’च्या या सं’क्र’म’ण काळात यंदाचा वाढदिवस ते आपल्या फार्म हाऊसमध्ये साजरा करतील. या खास प्रसंगी धर्मेंद्र यांनी अनेक सुप्रसिद्ध मीडिया चॅनल्सशी संवाद साधला. ते म्हणाले, “या महामारीमुळे प्रत्येकाच्या जीवनात उ’ल’था’पा’ल’थ झाली आहे. मी सुद्धा त्याच स्थितीत आहे. वाढदिवस साजरा करायची ही वेळ नाही आणि मी माझा वाढदिवस साजरा करणारही नाही. माझ्या कुटुंबातील मोजकेच लोक आणि मी असा फक्त माझ्या कुटुंबासमवेतच इथे फार्महाऊस वर साधेपणाने एकत्र सहभोजन करने हाच आजचा वाढदिवस साजरा करण्याचा एक मार्ग आहे.
धर्मेंद्र पुढे म्हणतात की, “खरे सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षांपासून माझा वाढदिवस साजरा करण्यात मला अजिबात रस नव्हता. माझी आई वा’र’ल्यापासून माझा वाढदिवस साजरा करायला मला आवडत नाही. ज्या आईने मला जन्म दिला, तीच या जगात नसल्यास मी वाढदिवस कसा साजरा करू? आजही मला दररोज माझ्या आईची आठवण येते, पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला तिची खूप आठवण येतेय.”
धर्मेंद्रच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सह-कलाकार रझा मुरादने त्यांच्याशी संबंधित अनेक रंजक किस्से सांगितले. ते म्हणतात, “दिलीपकुमारचा चाहता असलेल्या धर्मेंद्रचे, राजकुमारशी मात्र जगजाहीर शत्रुत्त्व होते. तो दिलीपकुमारचा मोठा चाहता आहे. तो दिलीप साहेबांचीही सेटवर बऱ्याचदा नक्कल करायचा. त्यांच्या आवाजापासून ते संवादापर्यंत, धर्मेंद्र यांना त्यांची न’क्क’ल करायला आवडत असे. त्याचवेळी अभिनेता राजकुमार मात्र त्याचा कधीच मित्र होऊ शकला नाही.
जेव्हा जेव्हा दोघे सेटवर एकत्र आले तेव्हा आसपासच्या लोकांमध्ये त’णा’व निर्माण झालेला असायचा. राजकुमार धर्मेंद्रच्या पाठीमागे काहीतरी आ’क्षे’पा’र्ह प्रकरण बोलला, त्या मुळे धर्मेंद्रला खूप रा’ग आला. अगदी हाणामारी होईपर्यंत हे प्रकरण गेले होते. पण राजकुमार शिवाय ते प्रत्येक कलाकाराचे चांगलेच मित्र होते आणि आहेत. ते खूपच भावनाप्रधान आहेत. ज्याप्रमाणे त्याच्या डोळ्यात लवकर अ’श्रू येतात, त्याचप्रमाणे त्याला खूप लवकर रा’ग’ही येतो.
महत्वाचे म्हणजे त्यांना भूक मुळीच सहन होत नाही. ‘गुलामी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सकाळचा नाश्ता यायला थोडा उशिरा झाला होता. धर्मेंद्र आणि त्याचा सहकारी स्टार मिथुन चक्रवर्ती हॉटेलच्या टेबलावर नाश्त्याच्या प्रतीक्षेत बसले होते. उशीर झाल्यामुळे धर्मेंद्र रा’गाने सं’ता’प’ले. त्यांचा चेहरा लाल झाला. ते टेबलावर रा’गा’ने हात मारू लागले. हे पाहून घाबरलेला मिथुन तातडीने हॉटेलच्या किचनमध्ये गेला आणि त्यांच्यासाठी अं’ड्यां’ची भु’र्जी स्वतः बनवून आणली. त्यानंतर कसाबसा त्याचा रा’ग जरा शांत झाला होता.” असे रझा मुराद यांनी सांगितले.
जुन्या काळात, रिंग व डायल असलेले टेलिफोन होते. धर्मेंद्र यांच्या हाताचा पंजा आणि बोटे खूप जाड आहेत. याच जाड जाड बोटामुळे धर्मेंद्र गे तो जुना डायल फोन स्वतः कधीही वापरू शकले नाहीत. त्यांचे बोट त्यात नेहमीच अडकायचे आणि म्हणूनच ते आपल्या मुलाला बॉबीला कॉल करून नंबर डायल करायला सांगायचे. फोन करणे ही नेहमीच त्याच्यासाठी समस्या असायची.
धर्मेंद्र यांच्याबद्दल एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे की ते बरेच म’द्य’पा’न करतात परंतु लोकांना हे माहित नाही की ते बऱ्याचदा दा’रू सोडतातही. त्यांच्या मनात आले तर ते चक्क ६ महिने दा’रूला शिवतही नाहीत. पण झटका आला, डोकं सरकले तर परत दा’रू पिण्यास सुरुवात करतात. ते स्पष्ट म्हणतात की मी दा’रुशिवाय जगूच शकत नाही. मी दा’रू कायमची सोडणे शक्यच नाही.
रझा मुराद म्हणतात की, “फार थोड्या लोकांना माहिती आहे की धर्मेंद्र हे अभिनयाशिवाय एक चांगले कवि देखील आहेत. तो उर्दूचा कवी आहे, खूप छान गझल लिहितो. त्यांना कवितेचे खूप चांगले ज्ञान आहे. सेटवर जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो एखादा पुस्तक घेऊन बसून कविता लिहू लागायचा. जेव्हा जेव्हा मेहफिल सजते तेव्हा धर्मेंद्र हे स्वतः लिहिलेल्या गझलां पेश करायचे.
त्यांनी उर्दू माध्यमात शिक्षण घेतले आहे आणि त्यामुळे त्यांचे उर्दू खूप चांगले आहे. अगदी तो आपला संवाद देखील उर्दूमध्येच लिहित असे.” धर्मेंद्र एक अतिशय भावनिक व्यक्ती आहे. ते भावुक होऊन लगेच र’ड’ता’त. छोट्या छोट्या भावनिक बोलण्यावरूनही त्याच्या डोळ्यात अश्रू येत असत. मी त्याला अनेक वेळा भावनिक होतांना पाहिले आहे. त्याला हेमा मालिनी खूप आवडतात आणि हेमाजीला सुद्धा ते खूप आवडतात. एकेकाळी धर्मेंद्र नेहमी बोलत असे की तो नक्कीच त्याच्या प्रेमात यशस्वी होणारच त्याने ते करूनच दाखवले.
धर्मेंद्रजींना स्टार मराठी टीम व आपल्या सर्व रसिक मायबापांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.