ब्रेकिंग! अभिनेता अमीर खान-किरण रावचा तब्बल १५ वर्षांनंतर घटस्फो’ट, घटस्फो’टाचे कारण…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्मार्ट पर्सन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि किरण राव हे एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे म्हटले जात आहे. तब्बल 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर या कपलने घटस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत या 15 वर्षांमध्ये आम्ही संपूर्ण आयुष्यभराचा आनंद, हास्य याचा अनुभव घेतला आहे. तर त्यातूनच या नात्यात एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास निर्माण झाला.
आता आम्हांला एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे. परंतु पती-पत्नी म्हणून नव्हे तर पालक आणि एकमेकांचे कुटुंब म्हणून..असे स्वतः किरण व आमीर खान यांनी सांगितले आहे. एकमेकांपासून विभक्त होण्याची प्रक्रिया ही काही दिवसांपासून सुरू झाली होती. तर आता ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. आपला मुलगा आझाद याचे संगोपन आम्ही दोघेही मिळून करणार आहोत.
तसेच आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर अनेक प्रोजेक्ट्सवर देखील एकत्र काम करत आहोत. आमचे कुटुंबीय, मित्र- मैत्रीणी आणि नातेवाईक यांनी आम्हांला या निर्णयात पाठिंबा दिला व आम्हांला समजून घेतलं. आमच्या सर्व हितचिंतकांचे देखील मनःपूर्वक आभार. नात्यातील घटस्फो’ट हा शेवट नसून तो नव्या प्रवासाची एक सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अभिनेता आमीर खान व किरण राव यांनी 2005 साली लग्न केलं होतं. “लगान” या चित्रपटासाठी किरणने सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले होते. 2011 साली किरणने सरोगसीच्या आधारे एका मुलाला जन्म दिला होता.
आझाद हा त्यांचा मुलगा आता नऊ वर्षांचा आहे. त्याआधी आमीरने 1986 मध्ये अभिनेत्री रिना दत्त हिच्यासोबत लग्न केले होते. या दोघांना जुनैद व आयरा ही दोन मुले होती. 2002 मध्ये रिना व आमीर यांचा घटस्फो’ट झाल्यावर दोन्ही मुलांची जबाबदारी रिना ने स्वीकारली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.