सैराट मधील मधील आर्ची आणि परश्या आज काय करतात आणि कसे दिसतात पहा, पाहून ओळखूच येणार नाहीत…

सैराट… नुसतं नाव जरी घेतलं तरी झिंगाट होऊन मराठी रसिकांना आठवते ती आर्ची अन परश्याची जोडी. स्टार दिग्दर्शक नागराज मंजुळेचे फाइंड असलेला टॅलेंटेड आकाश ठोसर आता परत रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. आणि ते सुद्धा बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत.

एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात परशासोबत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू तर आहेच… दिग्दर्शक आहेत अर्थातच नागराज मंजुळे. बरोब्बर अंदाज केलात. लवकरच नागराज मंजुळे यांचा नवीन चित्रपट रसिकांचे मनोरंजन करायला येतोय तो म्हणजे “झुंड”.

‘झुंड’ या सिनेमाचा टीजर ट्रेलर याआधी जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. परत एकदा नागराज “आण्णा” मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली आवडता सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत, हिट सहकलाकार रिंकू राजगुरू सह आकाश झुंड द्वारे रसिकांसमोर येतोय.

null

आर्ची अन परश्याच्या फॅन्ससाठी पुन्हा एकदा पर्वणीच ठरेल. अभिनयासोबतच तो स्वतःच्या लुक्सवरही तो प्रचंड मेहनत घेतोय. लॉकडाऊनच्या काळात ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ ही कादंबरी वाचून प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याचा आकाश आवर्जून उल्लेख करतो.

आकाश हा या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूपच उत्सुक आहे. आकाश विषयी सांगायचे झाले तर, मुळचा तो सोलापूरचा. त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मात्र पुण्यातलं. पुणे विद्यापीठातून त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला सिनेमाची आवड होती पण, आपणही कधी सिनेमात कॅमेऱ्यासमोर काम करून हिरो वैगेरे होऊ, असं कधी त्याच्या मनातही नव्हतं. बहुतेक सिनेरसिकांप्रमाणेच अमिताभ बच्चन हेच आवडते कलाकार.

आकाशला बालपणापासून कुस्तीची मात्र प्रचंड आवड. कुस्ती खेळण्याच्या प्रेमापोटीच कुस्तीसाठी प्रसिद्ध आखाडे असलेल्या नागराज मंजुळे यांच्या गावी गेला असतांना त्याला नागराज यांच्या छोट्या भावाने पाहिलं. त्यावेळेस सैराटसाठी हिरोच्या ऑडिशन्स चालू होत्या. त्यांनी आकाशला ऑडिशन आणि रोल संदर्भात विचारलं. आकाशला तशी थोडी कल्पना होती आणि नागराज मंजुळेच्या फँड्रीचा तो फॅनही होता.

null

आकाशने सैराटची ती ऑडिशन दिली. दोन दिवसांनी त्याची निवड झाल्याचं समजलं. नंतर लुक टेस्ट आदि सोपस्कार होऊन त्याच्या रोलवर शिक्कामोर्तब झालं आणि सिनेरसिकांना लाडका परश्या मिळाला. पैलवान आकाशला परश्यासाठी मोजक्याच काळात वजन घटवायचं होतं. आकाशने झपाट्यानं वजन कमी केलं.

आणि नागराज मंजुळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने परशाची भूमिका साकारली. पुढचा इतिहास आपण जाणतोच. दिग्दर्शकाच्या सूचनांचे तंतोतंत पालन हे तत्व त्याने अंगी बाणवले. ‘एफ. यु.’ म्हणजे फ्रेन्डशिप अनलिमिटेड या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातही त्याने ते पाळले. सैराट च्या अगदी विरुद्ध असलेला फ्रेन्डशिप अनलिमिटेड मधे आकाशाचा मॉडर्न लुक आणि रोल सिनेरसिकांना भावला.

चित्रपटांसोबतच आकाशने सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीज मध्ये कॉलेजच्या प्रोफेसरच्या प्रेमात पडणाऱ्या स्टुडंटची भूमिका आणि ती ही राधिका आपटेसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसोबत उत्तम साकारली होती.

सध्या आकाश व्यायामावर भर देतोय. कठोर मेहनत आणि नियमित व्यायाम करून आकाशने सिक्स पॅक्स सह पिळदार बॉडी बनविली आहे. फावल्या वेळात तो शेतीतही राबतोय. आता या चित्रपट क्षेत्रातच करियर करायचं ठरवून आकाश अगदी झोकून देऊन प्रत्येक भूमिकेवर, भाषेवर, लुक्सवर प्रचंड मेहनत घेतोय. “गरज आहे ती फक्त रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भरभरून केलेल्या कौतुकाची आणि आशीर्वादाची…” असे आकाश आवर्जून सांगतो.

Leave a Comment