रितेश देशमुख आणि जेनेलियाने यंदा फॅन्सला दिलेय स्पेशल ‘दिवाळी गिफ्ट’, जाणून घ्या काय आहे विशेष…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना एकत्र पाहण्याची संधी पुन्हा चाहत्यांना मिळणार आहे. सर्वांचा लाडका मराठमोळा सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलियासह त्यांच्या चाहत्यांसाठी आणलंय एक अनोखे सरप्राईज दिवाळी गिफ्ट. ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्म मधून ही जोडी आली आहे रसिकजनांच्या भेटीला.

दीपावली हा सण आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतो . दिवाळी सण साजरा करताना सर्वांच्या आनंदाला उधाण आलेले असते, यंदाही दिवाळीच्या आनंदात कमी नसली तरी कोरोना, लॉकडाउन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साहाला मात्र नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. ही पार्श्वभूमी लक्ष्यात घेऊन तरुण उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ने ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.

या शॉर्टफिल्ममधून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. फक्त इतकेच नव्हे, तर सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आणि आपले लाडके सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल हे देखील रितेश व जेनेलिया या दिग्गज मंडळीसह या अनोख्या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

या प्रोजेक्ट विषयी बोलताना शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर महेश लिमये म्हणाले की, ” सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली, आणि मग यातूनच ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली. विशेष म्हणजे या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकता क्षणीच अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल यांनीही होकार दिला.

पुनीत बालन यांच्या मनातील संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लिखाणातून उत्तम शब्दांत साकारली आहे. संगीतकार अजय – अतुल यांनी अतिशय कमी वेळेत नेहमीप्रमाणेच आपल्या दर्जेदार पार्श्वसंगीताचा साज ‘आशेची रोषणाई’ला चढवला आहे. आणि मुख्य म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी या शॉर्टफिल्मवर कळस चढविला आहे.

See also  'बिग बॉस' विजेता शिव ठाकरे पुन्हा पडलाय प्रेमात, जाणून घ्या कोण आहे ती विशेष व्यक्ती...

यावेळी बोलताना निर्माते पुनीत बालन यांनी सांगितले की, आमची ही ‘आशेची रोषणाई’ बघून नागरिक आपल्या जवळपासच्या गरजूंना छोटीशी मदत करून त्यांच्या आयुष्यात आपापल्या परीने प्रकाश आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.”

निर्माते पुनीत बालन यांची संकल्पना असलेली ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची सामाजिक संदेश देणारी सलग तिसरी निर्मिती  आहे. या शॉर्टफिल्मचे छायांकन आणि दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. पार्श्वसंगीत संगीतकार अजय-अतुल यांनी दिले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे व ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा व्हाइस ओव्हर लाभला आहे. ‘आशेची रोषणाई’चे क्रिएटिव्ह हेड विनोद सातव आहेत, तर कार्यकारी निर्माते म्हणून अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
विशेष महत्वाचे म्हणजे ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे. जरूर पहा. एक चांगल्या मोहिमेचा भाग व्हा. सर्वांना आनंद आणि प्रकाश वाटून आपल्यासोबतच सर्वांचा दिवाळसण साजरा करा…

See also  बिगबॉस फेम मराठी अभिनेत्री पडलीय प्रेमात, लवकरच करणार आहे लग्न, परंतु निवडलेला नवरा मात्र...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment