अभिनेता आस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नाली लवकरच अडकणार लग्न बंधनात, पण लग्नाबद्दल घेतला मोठा निर्णय…

मराठी सिनेसृष्टीत सध्या एकापाठोपाठ एक असा जणू लग्नसमारंभाचा पाठच सुरू झाला आहे. आस्ताद काळे व स्वप्नाली पाटील हे दोघेही आता लवकलच विवाहबंधनात अडकणार असल्याची खबर मिळाली आहे. ह्या दोघांची जोडी खऱ्या अर्थानं एकत्र फुलली ती बिग बॉसच्या घरातून.

त्या दोघांनीही काही दिवसांपूर्वी आपण रिलेशनशीपमधे असल्याची गोष्ट जाहीर केली होती. दोघेही त्यानंतर चर्चेचा विषय बनून गेले. दोघेही एकमेकांच्या ऑफीशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर एकमेकांचे फोटोज अनेकदा उत्कृष्ट कॅप्शन लिहित शेअरदेखील करतात. बिग बॉसच्या घरातच आस्तादने त्याची लव्हस्टोरी खुलेआम सांगितली होती.

मुळात तसं पाहता म्हणता येईल की, छत्तीस गुण जुळणारी ही जोडी नक्कीच काही खास आहे. बिग बॉस पर्वाची विजेती मेघा धाडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आस्ताद व स्वप्नालीच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. हे फोटो सध्या खुप चर्चेत व व्हायरल होताना पहायला मिळत आहेत.

मराठी सिनेसृष्टीत सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे, मानसी नाईक, आशुतोष कुलकर्णी यांसारख्या कलाकारांची लग्ने नुकतीच एकापाठोपाठ एक पार पडली. आणि यानंतर चाहत्यांना मिळणारी गोड बातमी म्हणजे, आस्ताद व स्वप्नाली यांच्या केळवणाचा सोहळा आता पार पडला आहे. मेधा धाडे सोबतच अभिनेत्री लेखिका शिल्पा नवलकर हीनेही त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सध्या अशीही चर्चा आहे की, १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईनचा खास मुहूर्त आस्ताद व स्वप्नाली यांनी निवडला आहे तो म्हणजे कोर्ट मॅरेज लग्न करण्यासाठी. लग्न हे साग्रसंगीत सोहळ्याप्रमाणे न करता कोर्ट मॅरेज बेस्ट आहे असं दोघांचही म्हणणं आहे. लग्नाची तारीख मात्र दोघांच्याही कुटुंबियांनी निवडल्याचं आस्तादने सांगितलं. कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही महिन्यांनी मोठी ट्रीप प्लॅन करण्याचाही विचार डोक्यात असल्याचही आस्ताद म्हणाला.

स्वप्नाली पाटील हिने मराठी गाजलेली मालिका पुढचं पाऊल यामधे उत्तम भुमिका बजावली होती. याच मालिकेत आस्तादही चांगल्या भुमिकेत होता. ह्या मालिकेतले सर्व कलाकार प्रसिद्धीमुळे घराघरात पोहोचले व सर्वांचे लाडके होऊन बसले. आता स्वप्नाली व आस्ताद यांच्या चाहत्यांना लवकरच त्यांच्या लग्नाच्या आनंदाची बातमी ऐकायला मिळणार यात काहीच शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment