‘माझ्या नवऱ्याच्या बायको’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता अभिजीत खांडकेकर आज तमाम महाराष्ट्राला चांगलाच परिचयाचा आहे. त्याच्या महाराष्ट्रभर असलेल्या प्रसिद्धीत मोठा मोलाचा वाटा हा नक्कीच “माझ्या नवर्‍याची बायको” या मालिकेचा राहिला आहे. या मालिकेतील गुरू नावाच्या पात्राची भुमिका अभिजीत निभावतो असल्याचं आजही पहायला मिळतं.

सुरूवात आणि मध्यंतरीच्या काळात ही मालिका विविध नाट्यमय घटनांनी परिपक्व आणि उत्कंठावर्धक ठरली, ज्यामुळे यातील गुरू पत्रासोबतचं राधिका या पात्रानेही अनेकांची मने जिंकली. या मालिकेच्या जोरावर शनाया, राधिका, गुरू या पात्रांसोबत इतर पात्रांनाही चांगलीच प्रसिद्धी लाभली.
IMG 20200508 WA0092
अभिजीत खांडकेकर या मालिकेत काहीशा नकारात्मक शेड्समधे दाखवण्यात आला आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे तो एक उत्कृष्ठ नट आहे. त्याने “जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा” यासारख्या दर्जेदार सिनेमाप्रमाणे इतर सिनेमेही केले आहेत, अभिजीत अनेक कार्यक्रमात निवेदनाच कार्यही बखुबीने पार पाडताना दिसतो.

मुळात महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्याला जरी जका मालिकेतून तीन तीन मुलींच्या प्रेमात पडणारा लग्नानंतरचा मुलगा दाखवलं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो एकाच व्यक्तीशी लाॅयल आहे. त्यानेच पहिल्यांदा त्याची प्रेयसी सुखदाला प्रपोज केलं असल्याचं कबूल केलं आहे. मुळात नंतर सुखदानेही त्याचं प्रपोजल स्विकारलं आणि दोघे नंतर रेशीमगाठीच्या बंधनात अ’ड’ल्या’चे पहायला मिळाले.
DZb5EO4X0AAKq1Y
सुखदा देशपांडे या अभिनेत्रीशी अभिजीतचा विवाह झाला. सुखदा ही मराठी नाटकांमधे काम करणारी, त्याशिवाय बाजीराव मस्तानी या सिनेमात तीने बाजीराव पेशव्यांच्या बहिणीची भुमिकाही बजावली होती. सुखदा एक कथक डान्सरदेखील आहे. नुकतचं १ फेब्रुवारीला दोघांच्याही लग्नाचा वाढदिवस पार पडला.

त्या दोघांच लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. अनेकांना वाटते की त्यांनी त्यांच लव्ह हे अरेंज मॅरेज केलं. परंतु तसं काही न करता आपल्या प्रेमाला खरं ते लव्ह मॅरेजचंच रूप ठेवतं त्यांनी लग्न केलं. दोघांची लव्हस्टोरी थोडी हटके निश्चितच आहे, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यामातून दोघांच्या एकमेकांशी ओळखी झाल्या होत्या.
73555228
अभिजीत आणि सुखदा तसे गावकरी कारण दोघेही नाशिकचेच. एकदा एका डान्सच्या कार्यक्रमातून नाॅर्मल भेट झालेली परंतु प्रत्यक्ष संबंध एकमेकांचा त्यांना आला नव्हता. एका काॅमन फ्रेंडमुळे ओळख झालेली परंतु बोलणं अजूनही नव्हतंच. त्याच दरम्यान अभिजीतची “माझिया प्रियाला प्रीत कळेना” ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. आणि याच मालिकेतील भुमिका पाहून सुखदाने सर्वप्रथम फेसबुकवर अभिजीतला कौतुकाच्या शाबासकीची थाप दिली होती.

हळूहळू मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. सर्वप्रथम अभिजीतने सुखदाला प्रपोज करत म्हटलं की, या नात्याला आपण आणखी पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि ते करायला आपल्याला काहीच हरकत नाही. मग फायनली नाशिकमधे दोघांच लग्न फार धु’म’ध’डा’क्या’त पार प’ड’लं.
DMkH7AAWAAIho2o
सुखदा एक कथक डान्सरदेखील आहे आणि तिने अगोदर अमोल कोल्हे या अभिनेत्यासोबतही काम केलं आहे. “धरा की कहानी” या हिंदी मालिकेतही ती झळकली होती. तर मुळात गम्मत म्हणजे अशा प्रकारे अभिजीत व सुखदा ही जोडी एकत्र येत गेली, नात खुलत गेलं, आणि अचानक ट्विस्ट येत त्यांची प्यारवाली लव्ह स्टोरी पूर्णत्वाला गेली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment