ऐश्वर्या रायच्या अगोदर करिष्मा कपूर सोबत झाला होता अभिषेक बच्चनचा साखरपुडा, पण या कारणामुळे तुटले होते नाते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

करिश्मा कपूर आता 46 वर्षांची झाली. तिचा जन्म 25 जून 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. ती लोकप्रिय राज कपूरची नात आहे. तिचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता कपूरसुद्धा अभिनय जगतात आहेत. करिश्माचे आजोबा राज कपूर तिच्यावर खूप प्रेम करीत होते.

करिश्मा केवळ १७ वर्षांची होती तेव्हा, १९९१ मध्ये डायरेक्टर के. मुरलीमोहन राव यांच्या प्रेम कैदी चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये डेब्यू केला. १९९६ च्या सुपरहिट फिल्म ‘राजा हिंदुस्थानी’ साठी तिला पहिल्यांदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी करिश्मा ही बच्चन कुटुंबाची सून होणार होती. ऐश्वर्या रायच्या आधी अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा करिश्माशी झाला होता हे फार कमी लोकांना माहिती आहे. अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते आणि त्यानंतर जया बच्चन यांनी संपूर्ण माध्यमांसमोर आपल्या मुलाची सून म्हणून करिश्माला स्वीकृती दिली होती. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या इग्जमेंटची घोषणा त्या निमित्ताने झाली.

See also  पाकिस्तानात आहेत बॉलिवूड स्टार्सचे डुप्लिकेट, हे फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

त्यावेळी जया बच्चन म्हणाल्या होत्या “बच्चन कुटुंब आणि नंदा कुटुंब त्यांच्याबरोबर आणखी एक कुटुंब जोडत आहे आणि ते म्हणजे कपूर कुटुंब, आणि माझी भावी सून करिश्मा कपूर आहे. आपल्या वडिलांच्या 60 व्या वाढदिवशी त्यांनी ही अभिषेकची भेट असल्याचे सांगितले.

करिश्मा आणि अभिषेक एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांनी एकमेकांना जवळपास ५ वर्ष डेट केले होते आणि २००२ मध्ये दोघींचा साखरपुडा झाला होता. सगळं व्यवस्थित चालू होतं की काही महिन्यांतच बातमी आली की दोघांचा साखरपुडा मोडला. आणि 2003 मध्ये करिश्माचे घटस्फोटित उद्योगपती संजय कपूरशी लग्न झाले.

रिपोर्ट्सनुसार करिश्मा आणि अभिषेक यांचे नटे तुटण्याचे कारण करिश्माची आई बबिता होती. जेव्हा बबिताने आपल्या मुलींना एकटीनेच वाढवल्या होत्या तेव्हा तिला तिच्या मुलीचे आर्थिक सबलीकरण करायचे होते. अभिषेक त्यावेळी बॉलीवूडमध्ये संघर्ष करत होता आणि करिश्मा तेव्हा प्रगतीच्या शिखरावर होती. म्हणून बबिताने बच्चन कुटुंबाला अभिषेकच्या नावाने आर्धी संपत्ती करण्यास सांगितले, जेणेकरून करिश्माचे भविष्य सुरक्षित होईल, परंतु तसे घडले नाही म्हणून त्या दोघांचे संबंध तुटले. त्यानंतर अभिषेकने 2007 मध्ये ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.

See also  “माझ्या बहिणीच्या नवऱ्या सोबत आईने तिला रंगेहाथ पकडलं होतं”, शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचा धक्कादायक खुलासा…

डेव्हिड धवन करिश्माला भाग्यवान मानतात. करिश्मासह डेव्हिडचे, राजा बाबू, अंदाज, कुली नं 1, जुड़वा, हीरो नं. 1, बीवी नं 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई, यांसारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले.

राजा हिंदुस्थानी आणि फिजा यांच्यासाठी करिश्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘दिल तो पागल है’ साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि जुबैदासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड फॉर बेस्ट एक्ट्रेस पुरस्कार मिळाला.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment