WHO चा धक्कादायक अहवाल: भारतातील ‘एवढे’ मुले धनुर्वात लसीपासून वंचित

Advertisement

जीनिव्हा: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2020 मध्ये देशातील 30 लाखाहून अधिक मुले घटसर्प-धनुर्वात-डांग्या खोकला या तीन आजारांच्या संयुक्त लसीपासून वंचित असल्याचे WHO च्या अहवालात दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. भारतासह जगभरात हीच स्थिती आहे. 2019 च्या तुलनेत ही संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भारतात 2019 च्या तुलनेत ‘डीपीटी’ लसीचा डोस न मिळणार्‍या मुलांची संख्या वाढली आहे. लसीच्या ‘डीपीटी’ या गटात घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या आजारांचा समावेश आहे. यूनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार मध्यम उत्पन्न असणार्‍या देशातील मुलांना ही लस कमी प्रमाणात मिळाली आहे.

See also  येदियुरप्पा यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, परंतु एकदाही कार्यकाळ पूर्ण शकले नाहीत, जाणून घ्या खास गोष्टी
Advertisement

मध्यम उत्पन्न असणार्‍या देशातील मुले सर्वाधिक वंचित

जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संसर्गामुळे मुले लसिपासून वंचित राहिले असल्याचे WHO ने अहवाला म्हटले आहे. श्रीमंत देशातील मुलांचे लसीकरण योग्य आहे. मात्र, गरीब देशात ही परिस्थिती बिकट आहे. जवळपास दोन कोटींहून अधिक बालकांना प्राथमिक लसही मिळाली नाही. जगभरातील लसीकरणातील असमानताही समोर आली असून ज्या 1 कोटी 70 लाख मुलांना एकही लस मिळाली नाही, ती बहुतेक मुले दुर्गम प्रदेश किंवा झोपडपट्टीतील आहेत. कोरोना लढ्यात गुंतल्यामुळेही अनेक ठिकाणी या नेहमीच्या लसीकरणावर परिणाम झाला.

Advertisement

जगातील सर्व देशांचे कोरोना लसी मिल्वण्यावर लक्ष आहे. यामुळे त्यांचे इतर लसीकरणावर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लहान मुलांत इतर आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

See also  महाराष्ट्राला दरमहा कोरोना लसीच्या तब्बल ‘एवढ्या’ कोटी डोसची आवश्यकता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

लस न मिळालेली बालके (भारत)

Advertisement

2019 मध्ये 14 लाख 3 हजार मुले लसीपासून वंचित होती. 2020 मध्ये हा आकडा दुप्पटीहून अधिक वाढला. 2020 मध्ये तब्बल 30 लाख मुलांना लसीपासून वंचित राहावे लागले.

Advertisement

Leave a Comment

close