डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणी आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणी आरोपी विक्रम भावेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याला 3 आठवड्यासाठी रत्नगिरीला जाण्याची परवानगी मिळाली आहे.

प्राप्त माहिती नुसार आरोपी विक्रम भावे याला याआधीच जामीन मंजूर झाला होता. पण त्यात पुणे जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई होती. ही अट शिथिल करण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. विक्रम भावेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता यावे म्हणून उच्च न्यायालयाने ती अट शिथिल करत त्याला रत्नागिरीला जाण्याची परवानगी दिली.

Advertisement
vikram bhave 1200
Vikram Bhave

विक्रम भावेने अंत्यविधीला जाण्यासाठी आणि बँकेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी 4 आठवड्यासाठी जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने 3 आठवड्यासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान त्याला दर रविवारी देवरुख पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पुण्यात परत आल्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायलयाने दिले आहेत. त्याला एक लाख रूपयांचा जामीन मंजूर झाला आहे.

See also  'तिथे' पडली होती ठाकरे आणि राणे वा'दा'ची ठिणगी; राज सह वहिनीही होत्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात...

विक्रम भावे हिंदू विधिज्ञ परषदेत कार्यकर्ता म्हणून काम करत होता. सीबीआयने दाभोळकर हत्या प्रकरणात इतर आरोपी सचिन अंदुरे, शरद काळसकर यांची चौकशी करून विक्रम भावेला अटक केली होती. पुणे शहरात 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ, नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती.

Advertisement

Leave a Comment

close