आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अभिनेता भरत जाधवने गावात उभारले स्मारक! फोटो होतायत व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचकांनो, आजकाल आपण अशी अनेक उदाहरणे पाहिले असतील की मुलं आपल्या आई वडीलांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडून देतात. वृद्धाश्रम मध्ये पाठवतात. पण नकारात्मक घडणाऱ्या या काळात काही सकारात्मक, दिलासा देणाऱ्या गोष्टी सुद्धा खूप घडतात.

मराठी मधील एक सेलिब्रिटी असा आहे की ज्यांनी आपल्या आईवडीलांच्या स्मृतीत खूप अभिमानस्पद काम करून प्रेमाची, माणुसकीचं जणू की दर्शनच दिलेलं आहे. त्या सेलिब्रिटीचे नाव आहे, भरत जाधव. भरत जाधव यांनी काय केलं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तर चला मग जाणून घेऊयात की भरत जाधवांनी केलेल्या कामावर लोक का कौतुक आणि प्रचंड शुभेच्छा देतायत.

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'नाची लागण...

सध्याच्या या कलियुगी काळात शहरात, रस्त्यावर, फुटपाथवर अनेक म्हातारे म्हातारी भिख मागून जगताना पाहत असतोल. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की नक्कीच हे चांगल्या घरातील असतील;

पण मग या वाटेला का आले बरे ? तर याचं कारण ही त्यांची स्वतःची मुलेच आहेत. आज अनेक मुलं आपल्या वृद्ध आई- वडीलांना आधार देत नाही आहेत. आधाराशिवाय त्यांना वाऱ्यावर सुडल्याच्या अनेक घटना सुद्धा अनेक समोर आल्या. परंतु या सर्वांच्या पलीकडे भरत जाधव हे सुपरस्टार अभिनेते एक आदर्श उदाहरण आहेत. मराठी जेष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या आई-वडिलाप्रती असलेले प्रेम खूप वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले आहे.

%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4 %E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5 2

जे मुलं आपल्या आई – वडिलांचा सांभाळ करत नाही, वाऱ्यावर सोडतात अश्यांना त्यांनी उपदेश देण्याचा देखील प्रयत्न केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोकं कौतुक करत आहेत. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी कोल्हापूर येथील असलेल्या शेतात आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दोघांचे ही मोठे स्मारकं उभारली आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे होणाऱ्या नवऱ्या सोबतचे फोटो झाले व्हायरल...

हे फोटो शेयर करताना त्यांनी एक पोस्ट सुद्धा लिहिलेली आहे. ज्यामध्ये काय लिहिलं चला ते पाहुयात.

भरत जाधव यांनी सोशल मीडिया च्या पोस्ट मध्ये लिहिले की, ” आई वडिलांच्या स्मरणार्थ आज आम्ही कोल्हापूर येथील आमच्या शेतात त्यांचं स्मारकं उभारलं. मी सर्व मुला मुलींना सांगू इच्छितो की आपले आई वडील सदेह आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांची भरपूर सेवा करून घ्या. त्यांना आदराने- सन्मानाने वागवा. त्यांच्या नजरेत आपल्यामुळे आनंद आणि अभिमान दिसावा यासाठी प्रामाणिक कष्ट करा. आई वडिलांच्या मुखातून मनापासून आलेल्या आशीर्वादाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही,’ भरत जाधव यांनी खूप प्रेरणादायी असा इतिहास समोर ठेवलेला आहे. सलाम ! अश्या वृत्ती ला. असे मुलं असावेत जे आई बापांच्या कष्टाला पुरून उरतील.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुग्धा गोडसेने लग्नाच्या २ वर्षानंतर पतीबद्दल केला मोठा खुलासा, ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment