एकेकाळी सुपरस्टार असणारा गोविंदा अचानक का इंडस्ट्रीतुन गायब झाला कि गायब केला गेला, जाणून घ्या बॉलीवूडची ती बाजू…

.

एक असा अभिनेता आहे की ज्याने एक दशक खूप गाजवलं आहे. त्यावेळी त्याचे सगळे चित्रपट सुपरहिट झाले होते. त्यामुळे तो सुपरस्टार बनला होता. त्याचं नाव होतं तुमचा आमचा सगळयांच्या लाडाचा गोविंदा.

गोविंदा हा 90 च्या दशकाचा सर्वात महागडा अभिनेता असायचा, त्याचे नृत्य जग वेडे होते. त्याची स्टाईल, त्याची अदावर सगळेच रसिक फिदा व्हायचे. त्याचा डान्स तर त्याकाळी खूप लोकप्रिय झाला होता. त्याने तर खरी गोविंदाला जास्त ओळख करून दिली. त्याचा अभिनय ही रसिकांना खूप पसंत पडायच.

पण झालं असं की आता गोविंदाची फिल्मी कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात आली आहे, तर त्याचे जुने कलाकार अजूनही चित्रपटांमध्ये दिसतात. कारण कळत नाही आहे पण तो आता फिल्म मध्ये दिसत नाही. प्रेक्षकांना सुद्धा त्याचं नसणं पसंत नाहीये. कारण एकेकाळी गोविंदा प्रेक्षकांच्या मनातला सुपरस्टार अभिनेता होता.

असं म्हणलं जातं की खरं तर, गोविंदाला आपल्या यशाचा इतका अभिमान होता की तो स्वत: ला देव मानू लागला आणि लोकांशी गैरवर्तन करू लागला आणि अभिमानामुळे त्याने सुपरहिट झालेल्या अनेक चित्रपटांना नकार दिला. असं एक मुलाखतीत त्याच्या विरोधात एका दिग्दर्शकाने जवाब दिला होता.

अहंकार ही गोष्ट भल्या भल्याला खाली आणते. जर गोविंदा सुपरस्टार झाल्यावर अहंकारी झाला असेल तर नक्कीच त्यामुळे तो चित्रपट मध्ये दिसत नाही. पण असेही म्हंटले जाते की गोविंदा ला जाणून बुजून काम मिळून देत नाही. त्याने अनेक वेळा सांगितलं आहे की मला धमक्या येतात. काम करू देत नाहीत. सलमान खान चं जरी त्याने नाव नसलं घेतलं तरी बॉलिवूड मधील भाई लोक मला त्रास देतात असा त्याचा सरळ रोख आहे.

पण काही शक्यता अशाही लावल्या जातात की या वयातही गोविंदाला नायकाची भूमिका करायची होती आणि यासाठी कोणी तयार नव्हते, चित्रपट बनवण्याचे ज्ञान नसण्याव्यतिरिक्त त्याने आपल्या भावासोबत अनेक चित्रपट केले जे हळूहळू कारकिर्दीत वाईट रीतीने फ्लॉप झाले. जसा आलेख खाली पडत होता आणि तसा आता तर गोविंदा चित्रपटात अजिबात दिसत नाही. हे त्याच्या आयुष्यात आलेलं खूप अपयश तो समजतो.

गोविंदा ने अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. त्यात अनेक चित्रपट कॉमेडी आहेत. त्याच बरोबर त्याची संजय दत्त बरोबर खूप जोडी जमायची. आजही त्याचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात.

गोविंदा चं पूर्ण नाव आहे गोविंदा अरुण आहुजा. त्याचा जन्म मुंबईत 21 डिसेंबर 1963 मध्ये झाला होता. आज वयाची साठी पर्यंत गोविंदा आलेला आहे. त्याची परिस्थिती खूप हलाखीची होती. लहानपणी पासून मोठेपणी होईपर्यंत त्याने खूप हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत. हिरो नंबर 1, राजबाबू, अखियो से गोली मारे, दुले राजा सारख्या खूप साऱ्या यशस्वी फिल्म केलेल्या आहेत.

त्याचं करियर इंडस्ट्री ने बंद केलं आहे असा त्याने अनेक वेळा आरोप केलेला आहे. पण खुलेपणाने कुणाचं ही त्याने नाव घेतलेलं नाही. गोविंदा खरंच एक चांगला अभिनेता होता. त्याचं काम प्रेक्षकांना पाहायला मिळायला हवं होतं.

आता पुढे तरी गोविंदा काम करतो की नाही किंवा चित्रपट मिळतात की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. गोविंदा ने इंडस्ट्री ला डान्स, अभिनय, कॉमेडी या सगळ्या बाबतीत नवं वळण दिल होतं. पण आज त्यालाच इथं इंडस्ट्री मध्ये थांबा दिसत नाहीये. लवकर त्याची एखादी फिल्म येऊन या वयात तरी त्याचं करियर पुन्हा सुरू व्हावं म्हणून गोविंदा ला खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment