तीन अफेअर्स आणि दोन लग्नं करूनही आज एकाकी जीवन जगतोय हा प्रसिद्ध अभिनेता, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

एक बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून आपण सर्वच जण तामिळ सुपरस्टार कमल हसन यांना ओळखतो. कमल हसन एक उत्कृष्ट क्लासिकल डान्सर आणि सिंगर आहे. त्याचे त्याने खास प्रशिक्षण घेतले आहे. भरतनाट्यम मध्येही तो पारंगत आहे.आहे. आजवर कमलने ज्या क्षेत्रात नशीब आजमावले, तिथे त्याच्या नशिबी यश लाभले.

अभिनयासोबतच कथा, पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य, कोरिओग्राफी अशा सगळ्यात सर्वच क्षेत्रात कमलने सफलतेची चव चाखली. पण प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत मात्र तो जरा अपयशीच राहिला. तब्बल तीन अफेअर्स आणि दोन लग्नानंतरही कमल आज एकाकी आहे. कमल हसनचे वैयक्तिक आयुष्य अनेक अभिनेत्रींशी असलेल्या प्रेम संबंधांमुळे  वादग्रस्त ठरले.

Advertisement

आज कमल हसनचा वाढदिवस. दि. ७ नोव्हेंबर १९५४ रोजी एका तामिळ कुटुृंबात कमलचा जन्म झाला. त्याचे लहानपणीचे नाव पार्थसारथी. सन १९७० मधे कमल हसन आपल्या चित्रपट करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री श्रीविद्याच्या प्रेमात प’ड’ला. दोघांचे प्रेमसंबंध बराच काळ सुरु होते. मात्र यानंतर दोघांनीही सहमतीने वि’भ’क्त होण्याचा निर्णय घेतला. श्रीविद्याने सन २००६ मध्ये जगाचा निरोप घेतला त्याआधी तिला अखेरचे भेटण्यासाठी कमल हसन आवर्जून पोहचला होता.

See also  एकाच सीनमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या ‘मंदाकिनी’चे खरे नाव माहिती आहे का? ऐकून विश्वास बसणार नाही

श्रीविद्याशी ब्रेकअप झाल्यानंतर १९७८ साली २४ वर्षीय कमल हसनचे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या डान्सर वाणी गणपतीशी प्रेमसंबंध जुळले. या दोघांनी लग्नही केले. १० वर्षे संसार केल्यानंतर १९८८ साली वाणी व कमल हसन यांचा घटस्फो’ट झाला आणि ते विभक्त झाले.

Advertisement

वाणीशी घटस्फोट झाल्यानंतर कमल हसन च्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाचा प्रवेश झाला. यानंतर कमल हसन आणि सारिका दोघे लिव इनमध्ये राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. १९८८ सालीच सारिकाने श्रुतीला जन्म दिला आणि त्यानंतर मग कमल हसनने सारिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सारिकाने अभिनय बंद केला आणि ती संसारात रमली. १९९९ साली तिने अक्षराला जन्म दिला. मात्र २००२ साली कमल हसन आणि सारिका यांनी घटस्फो’ट घेतला. एवढे होऊनही २ लेकींचा पिता असलेल्या कमल हसनच्या अफेअरच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.

See also  अभिनेता आणि त्याच्या वडिलांसोबत चित्रपटात रोमांस केला आहे या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर...

सारिकाशी घटस्फोट झाल्यानंतर कमल हसन आपल्यापेक्षा वयाने 22 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्री सिमरन बग्गा हिला डेट करु लागला. मात्र अचानक यानंतर सिमरन हिने आपल्या बालपणीच्या मित्रासह लग्न केले आणि कमलसह असलेले सगळे संबंध तोडले.

Advertisement

कमल हसनच्या जीवनात आणखी एका अभिनेत्रीचा प्रवेश झाला. सिमरन आयुष्यातून आ’ऊ’ट झाली म्हणल्यावर कमलच्या जीवनात गौतमी तडीमल्ला आली. दोघंही २००५ ते २०१६ या कालावधीत लिव इन रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघंही सहमतीने वेगळे झाले. याची माहिती खुद्द गौतमीनेच दिली. कमलच्या मुली श्रुती, अक्षरा आणि गौतमीची मुलगी शुभलक्ष्मी या सध्या एकत्रच राहतात.

कमल एक क्लासिकल डान्सर आणि सिंगर आहे. त्याचे त्याने खास प्रशिक्षण घेतले आहे. त्याने भरतनाट्यम शिकले आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक बारामुरालीकृष्णा यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. कमल अनेक भाषा बोलू शकतो. तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

कमल हसनला त्याच्या वाढदिवसानिमित्त स्टार मराठी तर्फे हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close