‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेत्यासोबत ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेत्यासोबत तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्रीचा झाला साखरपुडा. सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत आता अभिनेत्री ऋचा आपटेचा उल्लेख करावा लागेल.

66849058

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणाला कु’स्ती शिकवण्यासाठी आलेली सखी म्हणजेच अभिनेत्री ऋचा आपटे हिने गुपचूप साखरपुडा केला असल्याचे आपल्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांना कळवले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तिने हा साखरपुडा केला असल्याने तिच्या चाहत्यांना हा सुखद ध’क्का बसला आहे. ऋचा आपटे हिने मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेता क्षितिज दाते सोबत हा साखरपुडा केला असून त्याने देखील आत्ताच ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

whatsapp image 2021 02 10 at 12.36.06 pm 202102559187

ऋचा आणि क्षितिज बन मस्का या झी युवावरील मालिकेतून एकत्रित काम करत होते. इथेच त्यांच्या प्रेमाचे सूर जुळून आले असे म्हणायला हरकत नाही. क्षितिज अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटात त्याने साकारलेली गण्याची भूमिका अधोरेखित करणारी ठरली आहे.

READ  "महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर" च्या स्पर्धकाला प्रसिद्ध मराठी उद्योजक प्रेक्षकाने दिलीय नोकरी, पण ठेवलीय ही भन्नाट अट...

याशिवाय सरसेनापती हंबीरराव या आगामी चित्रपटातही तो एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्राणी- मात्र चे दिग्दर्शन क्षितिजने निभावले असून मालिका, नाटक आणि चित्रपटातून तो सक्रिय असलेला पाहायला मिळतो आहे. तर ऋचा आपटे सोनी मराठी वाहिनीवरील अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारत आहे.

66849081

याशिवाय अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. क्षितीजने ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमात काम केले आहे. ऋचाने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत झळकली होती. याशिवाय अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांतून दोघांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.

आपल्या खासगी, सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्ट बद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.  छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा ऋचाच्या अभिनयावर रसिक फिदा असतात. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यातही तिच्या चाहत्यांना खूप उत्साह असतो.

READ  मराठमोळ्या अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य सरकारला खडा सवाल, महाराष्ट्र शासनाच्या मनमानी विरुद्ध तीव्र शब्दांत सं'ता'प...

rucha apte in tuzhat jeev rangala episode 589 2018

ऋचाने गेल्याच वर्षी अभिनेत्री क्षितीज दातेसोबत साखरपुडा केला होता. मात्र इतरांप्रमाणे ऋचाने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली नव्हती. आता तिचा साखरपुडा होऊन वर्ष झाले आहे. त्याचनिमित्ताने तिने तिच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करत आपला आनंद व्यक्त  केला आहे.

शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऋचा आणि क्षितीज रोमँटीक अंदाज दिसत आहे.  तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ऋचा आणि क्षितिज ‘बन मस्का’ या मालिकेतून एकत्रित काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.

rucha apte

दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या एकमेकांच्या कुटुंबाच्या उपस्थित दोघांनीही साखरपुडा केला होता.दोघांचा साखरपुडा झाला असला तरीही  सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही. तब्बल एक वर्षानंतर या दोघांनी केलेल्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांनी तसेच कलाकारांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

READ  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment