“श्यामची आई” या चित्रपटातील चिमुकला श्याम सध्या काय करतो, जाणून घ्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“श्यामची आई” हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झाला. आताच्या नवीन पिढीला हा सिनेमा आठवणे शक्य नाही. मात्र ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते लोक मात्र या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई हे दोन्ही चेहरे कधीच विसरू शकणार नाही. अभिनेत्री वरमाला, दामू अण्णा जोशी, सुमती गुप्ते, बाबुराव पेंढारकर अशा उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयाने हा सिनेमा त्या काळात देखील देखील सुप्रसिद्ध झाला.

या सिनेमातील ‘श्याम’ ही भूमिका साकारणारे अभिनेते माधव वझे हे आता 82 वर्षांचे झाले आहेत. म्हणजेच चिमुकला श्याम ने आता 80 ओलांडली. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या “श्यामची आई” या पुस्तकावर हा चित्रपट बनवला होता. त्यासाठी श्यामची आई म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांची निवङ झाली.

चित्रीकरण सुरू झाल्यानंतर चिमुकला श्याम हा सेटवर आला. परंतु वनमाला बाईंना मात्र तो मुलगा श्याम म्हणून काही पसंत पडेना. तसे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितले. त्यामुळे मग शूटिंग मध्येच थांबवावे लागले. मग काय पुन्हा एकदा सर्वजण नव्या श्याम च्या शोधात लागले. यादरम्यान आचार्य अत्रे यांना माधव वझे या मुलाचे नाव सुचले. त्यानंतर अत्रे थेट त्याच्या घरी गेले. त्यांना तो चिमुकलासा माधव अगदी पाहताक्षणीच आवडला. तर वनमाला यांना तो चुणचुणीत गोड माधव भरपूर आवडला.

See also  आलिया भट्टने या आगामी चित्रपटात 15 मिनिटाच्या रोलसाठी घेतली फी आहे तब्बल एवढी फीस...

मुंबई आणि कोकणात या सिनेमाचे चित्रीकरण व्यवस्थितपणे पार पडले. तुम्हांला कदाचित माहित नसेल, परंतु “श्यामची आई” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आचार्य अत्रे यांनी श्यामला म्हणजेच छोट्या माधवला हत्तीवर बसवून त्याच्या हातून मुंबईतील दादर परिसरात साखर वाटली. हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा माधव चे वय फक्त 14 वर्षे होते. मात्र एवढ्या लहान वयात सुद्धा त्यांच्या अभिनयाची जादू चाहत्यांच्या मनावर ठसली.

24410 349146192890 712994 n

माधव वझे यांचे सध्या वय 82 आहे. ते पुण्यात राहतात. श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी त्यांची ही पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात की,”श्यामची आई” या चित्रपटाच्या सहवासाने का होईना, मला आचार्य अत्रे साहेबांच्या सहवासात राहायला भेटले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे आणि त्या नंतरचे काही दिवस हे किती लोभस होते, हे फक्त माझं मलाच माहीत आहे. पुढे जेव्हा मला कुणी विचारायचे की, आचार्य अत्रे यांनी तुला काय दिलं. तेव्हा मी त्यांना अभिमानाने सांगायचो की, अत्रे साहेबांनी मला माधव वझे ही ओळख दिली.”

See also  या प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शकाचं झालं नि'ध'न, संपूर्ण मराठी सिनेसृष्टी शो'का'कु'ल...

“श्यामची आई” या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे एक उत्तम नट आहेत. तसेच त्यांचा रंगभूमीचा अभ्यास सुद्धा अतिशय दांडगा आहे. पुण्यातील वाङीया महाविद्यालयातून ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.

“थ्री इडियट्स” या चित्रपटात केले होते काम :
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेते माधव वझे यांनी “थ्री इडियट्स” या हिंदी चित्रपटात एक भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांनी आत्महत्या करत असलेल्या जॉय लोबोच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आलिया भट आणि शाहरुख खान यांच्या “ङियर जिंदगी” या चित्रपटात ते आलियाच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment