‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मधील अनिरूद्धची खरी बायको आहे खूपच सुंदर, जणू सौंदर्याचे वरदानच प्राप्त आहे…
सध्या स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका खूप प्रसिद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. नंतर काही दिवसांनी अनिरुध्द आणि संजना यांचे प्रेमप्रकरण घरी काही जणांना समजले. घरात त्यांच्या दोघांच्या मुलांनाही ते समजले.
अनिरुद्धने अभिषेकला काहीतरी सांगून समजवण्याचा प्रयत्न केला की त्याच्यात आणि संजनामध्ये काही चालू नाहीये, उलट संजनाच त्याच्या मागे लग्न कर म्हणून लागली आहे. परंतु जेव्हा लग्नाच्या विधींच्या वेळी अरुंधतीने ते दोघे एकमेकांच्या जवळ असताना पाहिले आणि जे काही प्रेमात ते बोलले, ते तिने ऐकले आणि ती बेशुद्ध झाली. अनिरुद्धने तरीही अभिषेकला खोटे सांगून त्याला सांभाळून घेतले.
पण अरुंधतीने जे काही पाहिलं आणि ऐकलं ते कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आता अरुंधती पुढे काय करते, अनिरुद्ध बरोबर ती कशी वागते आणि संजनाला ती कशी आणि काय बोलेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. आपण रोज आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची अरुंधती ही बायको आहे, त्याची तीन मुलं आहेत आणि एक संजना आहे जिच्यावर त्याचे प्रेम असते हे सगळं पाहतो.
पण आज आपण त्याच्या खऱ्या आयुष्यातील बायको आणि मुलांबद्दल माहिती घेणार आहोत. अनिरुद्धचे खरे नाव मिलिंद गवळी आहे जो आज आई कुठे काय करते या मालिकेमुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. अभिनेता मिलिंद गवळी हे एकदा बहिणीच्या सासरी म्हणजेच जळगावला गेले होते. त्याच स्टेशनवर मिलिंदला एक मुलगी दिसली आणि तिला पाहताक्षणीच पहिल्या नजरेतच मिलिंदला ती खूप भावली.
आवडल्या नंतर आपण गणित प्रेमाचं लग्नापर्यंत जाऊन पोहचल की नाही यासाठी मिलिंद त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि काही दिवसांनी तीच मुलगी एक लग्न कार्यक्रमात त्यांना दिसली.
मिलिंदने नंतर त्या मुलीची माहिती काढली तर समजले की ती मुलगी आपल्याच नातेसंबंधातली आहे. त्या मुलीचे नाव आहे दीपा. मिलिंदने ही गोष्ट घरीही सांगितली की त्यांना दीपा खूप आवडते आणि नंतर घरात लग्नाची बोलनीही सुरू झाली.
सरकारी नोकरी असणारा मुलगा असावा असं अनेकांचे मत असतं. तशी मुलीच्या घरच्यांची अशी अपेक्षा होती की मुलगा हा सरकारी नोकरी करणाराच पाहिजे. आता प्रेमापुढे कोणाचे काही चालत नाही.
मिलिंदने नंतर अभिनय सोडला आली एमपीएससीच्या परीक्षेची तयारी चालू केली. त्याला वाटलं की अभ्यास करून त9 आता एक मोठा अधिकारी होईल. पण शेवटी त्याला पुन्हा अभिनयात वळावं लागेल अस असतानाच त्याला सरकारी नोकरी लागली. नारळ फुटला.
त्याच्या आयुष्यात आनंदाची नदी वाहायला लागली. मिलिंद ही परीक्षा पास होऊन सरकारी नोकरीही करू लागले. त्यानंतर दीपा आणि मिलिंदचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंदला एक मुलगी आहे जिचे नाव मिथिला गवळी. तीही आता मोठी झाली आहे आणि तिचे २०१८ मध्ये लग्नही झाले आहे. ही आहे मिलिंदची खऱ्या आयुष्यातील प्रेम कहाणी. जी आपल्याला माहीत नव्हती. आज मिलिंद मालिकेत काम करत घराघरात पोहचला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.