‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत बबड्याच्या आजोबाची भूमिका साकारणार हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

झी मराठी वरील अग्गंबाई सासूबाई या दैनंदिन मालिकेमध्ये रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत मराठी सह बॉलीवूड चित्रपट सृष्टी गाजविलेले सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी अभिनेते, श्री. मोहन जोशी. जाणून घेऊ यात त्यांच्याविषयी.

रवी पटवर्धन यांच्या अभिनयामुळे आजोबांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अग्गंबाई सासूबाईमध्ये रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या आजोबांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.

त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोहन जोशी यांची स्वतःची अशी एक वेगळी अभिनय शैली आहे. त्यामुळे त्यांना आता या आजोबांच्या भूमिकेत पाहणे नक्कीच मनोरंजक ठरेल यात शंकाच नाही.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजीत, आजोबा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. आजोबांच्या व्यक्तिरेखेत आपल्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना पाहायला मिळाले होते. पण दुर्दैवाने, रवी पटवर्धन यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. सोम्या कोंबडीच्या, चप्पलचोर अशी बोलण्याची त्यांची स्टाईल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत होती.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेचे फॅन्स आजोबांना प्रचंड मिस करत आहेत. त्यामुळे आजोबांची व्यक्तिरेखा आपल्याला पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. रवी पटवर्धन यांच्या अभिनयामुळे आजोबांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना पाहायला मिळणार आहे. मोहन जोशी यांची ४ जानेवारीला या मालिकेत एंट्री होणार आहे.

रवी पटवर्धन यांचे ६ डिसेंबरला दुःखद नि’ध’न झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रा’स होत होता. म्हणून त्यांना खाजगी रु’ग्णा’ल’या’त दा’ख’ल करण्यात आले होते. पण तिथेच त्यांची प्रा’ण’ज्यो’त मा’ल’व’ली. मार्चमध्येही त्यांना हृ’द’य’वि’का’रा’चा झ’ट’का आला होता. रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते.

भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास ज’र’ब यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्याप्रकारे खुलून दिसत असे. त्यांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.

मोहन जोशी हे तर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा एक उत्तम खलनायक व चरित्र अभिनेते म्हणून सुप्रसिद्ध आहेतच. यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते.

बॉलिवूडमध्ये त्यांनी ख’ल’ना’य’क म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेत सध्या ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment