मराठीतला एक असा अभिनेता ज्याने हिंदीतही आपल्या अभिनयाचा डं’का वाजवला होता !…

काही अभिनेते असे असतात की त्यांची फिल्म आजही पाहिली तरी असं वाटतं की यार किती गोड काम आहे. आपल्या आसपास घडलेल्या घटनेवरच काम आहे. पात्र सुद्धा आपल्याला आपली वाटतात. कारण त्यांचं काम आपल्याला खूप भावतं.

नाना पळशीकर हे एक असे अभिनेते होऊन गेले आहेत की ज्यांचा अभिनय अजरामर झालेला आहे. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. आणि इथून पुढेही मिळत राहणार आहे. कारण त्यांनी केलेल्या सगळ्या भूमिका या समाजाचं कोणतं ना कोणतं प्रतिक घेऊन पडद्यावर आलेल्या आहेत.

त्यात आपल्या मराठी मातीत जन्मल्यामुळे आपल्याला अभिमान सुद्धा खूप आहे. मराठीत जन्मायचं आणि हिंदीत असा डंका वाजवायचा की चाहत्यान सोबत इंडस्ट्री प्रेमात पडली पाहिजी. नाना पळशीकरांच्या प्रेमात अख्खी इंडस्ट्री होती. सगळेजण त्यांना नाना म्हणायचे.

DemEPBCWAAA32oB

सायलेंट भूमिका जर इंडस्ट्री मध्ये कुणी करायची असं थोडा जरी विचार झाला की त्यावेळी इंडस्ट्रीत एकच नाव समोर यायचं ते म्हणजे नाना पळशीकरांचं. आजही त्यांचं काम पाहून अनेकजण खूप काही प्रेरणा घेतात. हे ही नव्हे थोडं. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत जास्त चित्रपट संयमी शांत अस्वस्थ करून सोडणाऱ्या भूमिकेतून केलेले आहेत.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी हालणार पाळणा, ख्रिसमसच्या निमित्त दिली चाहत्यांना गुडन्यूज...

तुमच्या आमच्यातला गरीब, संघर्ष वादी, अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत असणारयाची भूमिका नाना पडद्यावर असे साकारायचे की प्रेक्षकांना त्या व्यक्तीला भेटल्यासारखचं वाटायचं. नानांना या गोष्टीचा फार अभिमान वाटायचा. ते नेहमी म्हणायचे की मी हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अश्या पात्रांचा जर सिम्बॉल बनत असेल तर याच्या पेक्षा दुसरा आनंद माझ्यासाठी कोणताच नाही.

त्यांचं हॉलीवूड चित्रपट सृष्टी वर खूप प्रेम राहिलेलं आहे. त्यांना त्या चित्रपटाचा फार अभिमान होता. ते म्हणायचे की आजही आपण हॉलीवूड पेक्षा पन्नास वर्षांनी लहान आहोत. आपण करतोय चांगलं काम पण त्यांच्या इतकं तंत्र मंत्र अजून शिकायला आपल्याला वेळ जाईल.

EZli8hkWAAAXXj3

इथं आपण हिरो हिरोइनला कमी कपड्यांत नाचवलं की लगेच झाला चित्रपट अशी परिस्थिती झालेली आहे. कुणी कथेवर लक्ष देतं का ? मातीतील स्टोरी कुणी करतात का ? अश्या अनेक गोष्टीनी आपण मागे आहोत आपल्या इंडस्ट्रीला काम करावं लागणार आहे. अश्या मताचे होते नाना पळशीकर. त्यांनी दो बिघा जमीन , गांधी या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका तर आजही खूप लोकं आवर्जून पाहतात. अभिनेता नाना पळशीकर यांचा जन्म १९०७ ला मुंबईत मराठी कुटुंबात झाला.

READ  नववधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे अभिनेत्री सायली संजीव, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

कलेची आवड लहानपणीपासून असल्याने त्यांनी मोठेपणी अभिनयातच करीयर करायचं ठरवलं आणि बघता बघता नानांनी ८५ चित्रपटात काम केलं. एक प्रसिद्ध अभिनयावर काम करणारा अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. १९३५ साली धुवांधर सिनेमातून त्यांनी या क्षेत्रात अभिनेता म्हणून पदार्पण केलं. खूप सारं काम करायाला सुरुवात केली. त्यांच्या मुलाचं नाव आहे सुहास पळशीकर.

१९६२ ला कानून या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अभिनेता म्हणून फिल्मफेयर ही मिळालेला आहे. नाना खरच खूप इतर अभिनेत्यान पेक्षा वेगळे होते. भूमिकेला जिवंत करणारे होते.

आजच्या काळात जर नावाजुद्दिन, इरफान, राजकुमार असे अभिनेते दिसत होते तर त्याकाळी होते नाना पळशीकर. मराठी मध्ये जन्म घेऊन हिंदीत सुपरस्टार झालेले ते काही मराठी कलारांच्या पैकीच होते. नानांना अजूनही लोकं तितकच प्रेम करतात. 1 जुन १९८४ मध्ये जरी नानांची प्राणज्योत मावळली असली तरी त्यांनी करून ठेवलेल्या कामाने आजही ते जिवंत आहेत.

READ  प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड अडकली लग्न बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत खूपच व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment