कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या कणखर आवाजाने व सणसणीत अभिनयाने इंडस्ट्रीवर बराच काळ राज्य केले. आपल्या करियरच्या कारकीर्दीत नानांनी कित्येक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
त्यामुळे मीडिया रिपोर्टस् नुसार अभिनेते नाना पाटेकर हे कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत, असे म्हटले जाते. मात्र एवढे उच्चश्रीमंत असूनही त्यांना सर्वसामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगायला आवडते.
बॉलीवुडच्या मायानगरीत आपल्या तिखट अभिनयाने सर्वांच्या काळजावर अफलातुन वार करणारे अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये रायगड जिल्ह्यात झाला होता. “गमन” या चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपले पहिले पाऊल टाकले.
“क्रांतीवीर” आणि “तिरंगा” यासारख्या चित्रपटांतील कणखर अभिनयाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. नानांचा चित्रपट म्हणजे त्यांचे चाहते अगदी तहानभूक विसरून पाहत असत. कारण त्यांचे चमचमीत ङायलॉग्ज प्रेक्षकांना खूप आवडत असत.
मीडियाच्या माहितीनुसार नाना पाटेकर हे तब्बल 73 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्याचप्रमाणे ‘ख’ड’क’वा’स’ला’ येथे त्यांनी एक फार्महाऊस सुद्धा खरेदी केले आहे. या व्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे बक्कळ मालमत्ता आहे. त्यांचे हे फार्महाऊस एकूण 25 एकर आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे.
तुम्हांला ठाऊक आहे का, या फार्महाऊस मध्ये एकूण सात खोल्या आहेत आणि एक मोठा भव्यदिव्य हॉल आहे. त्यामुळे नाना आपला बराच वेळ या फार्महाऊस मध्येच घालवतात. येथे ते गहू, हरभरा आणि इतर धान्य पिकवतात व त्यानंतर हे धान्य विकल्यावर ते सर्व नफा आपल्या श्रमिकांसोबत वाटून घेतात.
बॉलीवुड व्यतिरिक्त नाना पाटेकर यांनी कित्येक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि भरपूर प्रसिद्धी देखील मिळवली आहे. आज अभिनेते नाना पाटेकर यांनी सत्तरी गाठली आहे. पण या वयातही ते खूप तंदुरुस्त दिसतात. नाना म्हणतात की माझ्या छंदात अभिनेता नव्हता, परंतु परिस्थितीने मला अभिनेता बनवले. त्यामुळे अजूनही त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगायला खूप आवडते.
अभिनेते नाना पाटेकर यांचा मुंबईत अंधेरी मध्ये प्लॅट आहे. त्याची किंमत साधारणपणे 7 कोटी रूपये आहे. त्यांना वाहनांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे ऑङी क्यू -7, महिंद्रा, स्कॉर्पिओ, रॉयल यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. नानांच्या पत्नीचे नाव नीलकांती असे आहे. तर त्यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे. त्याने चित्रपट दिग्दर्शनात आपले करियर बनवले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.