फिल्म इंडस्ट्रीत येण्याअगोदर हे काम करत होते ‘तिरंगा’ जानी उर्फ राजकुमार, एके दिवशी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हिंदी सिनेमाविश्वात बऱ्याच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे, पण असा एक असा स्टार होता ज्याने केवळ प्रेक्षकांच्या हृदयावरच राज्य केले नाही तर फिल्म इंडस्ट्रीनेही त्याला मानले ते म्हणजे राजा कुलभूषण पंडित उर्फ ​​राजकुमार.

8 ऑक्टोबर 1926 रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जन्मलेल्या राजकुमार यांनी पदवीनंतर मुंबईतील माहीम पोलिस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली.

एके दिवशी रात्रीच्या गस्तीदरम्यान एका शिपायाने राजकुमाराला सांगितले, हजूर आपण रंग, शरीरयष्टी आणि हावभावाने हिरोपेक्षा काही कमी नाहीत. जर तुम्ही चित्रपटांमध्ये हिरो झालात तर तुम्ही लाखो लोकांच्या मनावर राज्य करू शकता. राजकुमारला त्या शिपायाची कल्पना आवडली.

राजकुमार मुंबईतील ज्या पोलिस स्टेशनमध्ये नोकरीस होते, तेथे बऱ्याचदा चित्रपटसृष्टीतले लोक येत असत. एकदा चित्रपट निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामासाठी पोलिस स्टेशनला आले होते.

See also  हे आहेत बॉलिवूडमधील अगदी हुबेहुब दिसणारे बहीण-भाऊ, यांना एकत्रित ओळखणे आहे खूपच कठीण...

राजकुमारच्या बोलण्याची शैली पाहून ते खूप प्रभावित झाले आणि राजकुमार यांना त्यांच्या शाही बाजार चित्रपटा मध्ये अभिनेता म्हणून काम करण्याची ऑफर दिली. राजकुमार यांनी शिपायाचे ते बोलणे ऐकून अभिनेता होण्याचे आधीच मनापासून विचार केला होता, म्हणून त्यांनी तातडीने आपल्या उपनिरीक्षक पदाचा राजीनामा दिला आणि निर्मात्याची ऑफर स्वीकारली.

‘शाही बाजार’ हा चित्रपट तयार होण्यासाठी बराच काळ गेला आणि राजकुमारला आपले दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले. म्हणून 1952 साली रिलीज झालेल्या ‘रंगीली’ या चित्रपटाची छोटी भूमिका त्यांनी स्वीकारली. हा चित्रपट चित्रपटगृहात कधी आला आणि कधी निघून गेले हे कळलेच नाही.

याच दरम्यान, त्यांचा शाही बाजार हा चित्रपटही प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. शाही बाजाराच्या अपयशानंतर राजकुमारच्या सर्व नातेवाईकांनी आपला चेहरा चित्रपटासाठी योग्य नाही असे म्हणण्यास सुरवात केली, तर काही लोक तुम्ही चित्रपटांमध्ये खलनायकाचा रोल करा असे म्हणाले. 1952 ते 1957 या काळात राजकुमार यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष केला.

See also  "तारक मेहता..." मध्ये बबिताजींनी जेठालालला बांधली राखी, त्यानंतर जे घडले...

बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात ‘रंगीली’ चित्रपटाने केल्यानंतर, त्यांचे ‘आबशार’, ‘घमंड’ इत्यादी अनेक चित्रपट आले. तसे, आपल्या फिल्मी कारकिर्दीत राजकुमारने ‘तिरंगा’, ‘मरते दम तक’, ‘पाकीजा’, ‘हीर रांझा’ आणि ‘मदर इंडिया’ सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले. राजकुमार म्हणायचे की ‘त्याचे चित्रपट एका वेळी चालत नव्हते. चित्रपट चलो अथवा ना चलो, आपण अयशवी नाहीत.”

राजकुमार यांनी जेनिफर नावाच्या स्त्रीशी लग्न केले होते आणि जेनिफर फ्लाइट अटेंडंट होती. लग्नानंतर लगेचच जेनिफरने आपले नाव बदलून गायत्री केले होते. राजकुमार यांना एक मुलगा पाणिनी राजकुमार आणि एक मुलगी वास्तविकता राजकुमार असे दोन अपत्ये आहेत. राजकुमार यांनी गळ्याच्या कॅन्सर मुले ३ जुलै १९९६ ला या जगाचा निरोप घेतला, परंतु लोकांच्या हृदयात ते आज देखील आहेत.

See also  मुलाखत घ्यायला आलेल्या मुलीच्याच प्रेमात पडले अभिनेते रजनीकांत, एका नजरेत पाहताच तिला घातली लग्नाची मागणी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment