ड्वेन जाॅनसन दुसऱ्यांदा झाला जगभरातला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता, एका वर्षभरातील कमाई पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

तसं पाहायला गेलं तर एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीला फार मोठा वारसा जसा आहे तसाच इथे पैशांच्या वा कमाईच्या बाबतीत थाटही काही अनोखाच आहे. आपण सर्वच मनोरंजन जगताशी जोडलेले आहोत, अर्थात त्याला प्रत्येकाची विविध कारण असतात. त्यात अभिनय, नट – नटी, विनोद करणारी पात्रे व इतर भरपूर काही.

मुळात म्हणजे अनेक गाजलेले अभिनेते एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना भरगच्च रक्कम घेताना दिसतात, अर्थात तेवढा हक्कही त्यांनी कमावलेला असतो. नाही म्हणायला गेलं तरी अनेक अभिनेते एव्हानापर्यंत फारच श्रीमंत झाले आहेत. अशा याच फिल्मी जगतात अनेक अभिनेते त्यांच्या कार्याच्या शैली व खुबीने आठवणीत राहतात.

therock

परंतु बऱ्याचदा या अभिनेत्यांनी आयुष्यात वर्षाला केलेल्या कमाईच्या रकमा आपल्याला थक्क करून जातात. एका वर्षभरात यांची कमावलेली रक्कम कधीकधी आपल्या आयुष्याची जमापुंजीच्याही अधिकच म्हणावी. तर अशात बाबीवर प्रकाश टाकत एक बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे, या गेल्या वर्षात सर्वाधिक कमाई केलेल्या अभिनेत्याबद्दल. तो अभिनेता आणि त्याची कमाई तुम्हाला कदाचित चकीत करून जाईल, हे नक्की. २०२० या सालात आता सर्वाधिक कमाई केलेल्या लिस्टमधील पहिले नाव आहे ते, जगप्रसिद्ध अभिनेता “ड्वेन जाॅनसन” याच. ज्याला डब्लू डब्लु ई ( WWE) च्या जगतात “राॅक” या नावे ओळखलं जातं.

See also  सापापेक्षा देखील ख'त'र'ना'क असतात असे लोक, चाणक्य नीतीनुसार चुकूनही अश्या लोकांसोबत मैत्री करू नये...

अलीकडील दिवसांमधे ड्वेन जाॅनसन हे त्यांच्या चित्रपटांमधील कामातच व्यस्त असतात. सध्यातरी ते अनेक प्रोजेक्टवर काम करत असल्याची माहिती आहे. ड्वेन जाॅनसन यांची मागेच रिलीज झालेली “जुमांजी – द नेक्स्ट लेव्हल” ही फिल्मही गाजली. या सिनेमाने बाॅक्स आॅफिसवर चांगलाच गल्ला जमवला.

आता आपल्या माहितीखातर ही खास गोष्ट म्हणजे, ड्वेन जाॅनसन यांची वर्षभरातली कमाई ही तब्बल “८७.५ मिलीयन डाॅलर” इतकी आहे. या किमतीला जर भारतीय करंसीमधे मोजल्या गेलं तर ती तब्बल ६५० करोड रूपये इतकी मोठी रक्कम ठरते. जर अरबोंच्या तुलनेत हिशोब लावला तर ही रक्कम ६ अरब पेक्षा अधिक आहे.

rock

नुकत्याच फोर्ब्सने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमधे ड्वेन जाॅनसन हे पुन्हा एकदा पहिले अभिनेते ठरले आहेत, याआधीही त्यांनी हे स्थान पटकावलं आहे. आणि आता ही त्यांची दुसरी वेळ आहे जी की निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. या लिस्टमधे अक्षय कुमार यांनेही जागा पटकावली आहे, तो सहाव्या स्थानावर विराजमान आहे.

See also  अवघ्या 22 दिवसांच्या मुलीला कुशीत घेऊन ऑफीसवर रुजू झालेल्या "या" महिला IAS अधिकाऱ्यावर होतोय कौतुकाचा वर्षांव...

सहसा तसं पहायला गेलं तर ड्वेन जाॅनसन स्वत:ची ही जागा टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत देखील करतात. नुकतचं अलीकडे “रेड नोटीस” या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने २३.५ मिलीयन डाॅलर हे ड्वेन जाॅनसन यांना पेड केल्याचं समजत आहे. ड्वेन जाॅनसन एवढ्यावरच न थांबता इथून पुढे येणार्‍या प्रोजेक्ट्समधून बाॅक्स आॅफिस गाजवणार एवढं निश्चित आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment