बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता शरद केळकर यांची पत्नी आहे ही अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
ग्लॅमरस गोष्टी कोणत्या बरं ? तर आपल्या डोळ्यासमोर लगेच येईल की ग्लॅमरस गोष्टी म्हणजे सिनेसृष्टी. होय सिनेमात काम करणारी लोकं ही ग्लॅमरस आयुष्य जगत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून काही न काही करत ती प्रसिद्ध होत असतात. कुणी अभिनय करत पुढे येतं तर कुणी दुसरंच काही. तर त्या लोकांचे चाहते ही खूप असतात.
मग प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्या ची बायको कोण आहे ? ते कसे जगतात ? वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात. त्यामुळे हे चाहते सोशल मीडियावर फार कार्यरत राहतात. एक मराठी कुटुंबातील व्यक्ती जेव्हा हिंदी सिने सृष्टीत सुपरस्टार होतो तेव्हा की अभिमान वाटत असेल.
तो बहुमान मिळवला आहे शरद केळकर या अभिनेत्याने. होय ज्याने खूप मोठं मोठ्या चित्रपटात काम करून आपलं नाव आघाडी वर आणलेलं आहे. त्याची पत्नी सुद्धा एक प्रसिद्ध लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे; पण झालं असं की काहींना ती माहीत नाहीये. तर चला आज जाणून घेऊयात.
शरद केऴकरची पत्नी कीर्ती केळकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण लग्न झाल्यापासून ती मालिकांपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने नुकताच तिच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शरद आणि कीर्ती दोघेही या फोटोत खूपच क्यूट दिसत असल्याचे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरील कमेंटद्वारे सांगत आहेत. शरद आणि कीर्ती यांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने झाले होते. कीर्तीने शेअर केलेल्या या फोटोत शरद तिच्याकडे पाहाताना दिसत आहे. त्यामुळे फोटोसोबत ऐसे ना देखो… अशी कॅप्शन तिने लिहिली आहे.
२००५ मध्ये शरदने कीर्तीशी लग्न केले. त्यांना मुलगी असून तिचे नाव किशा आहे. कीर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कीर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले आहे. नच बलिए या रिअॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे.
छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा, मराठी सिनेमा असो किंवा मग बॉलिवूड या सगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने शरद केळकरने रसिकांची पसंती मिळवली आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे त्याने आपली छाप रसिकांवर पाडली आहे. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला होता.
त्याने साकारलेल्या या भूमिकेने तर रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. सर्वच स्थरावरून त्याच्या भूमिकेचे त्याच्या कामाचे कौतुक झाले. त्यामुळे नक्कीच ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमा शरद केळकरसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
आजही शरद केळकर वेगवेगळ्या भूमिका घेऊन येणार आहे. त्याचं प्रत्येक काम हे खूप अभ्यासपूर्ण पध्दतीने केल्याचं दिसून येत आहे. आणि त्याला त्याच्या बायकोला पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.