कियाराला चक्क ‘या’ नावाने हाक मारतो अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, स्वतः केला खुलासा…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत कित्येक ब्युटीफूल कपल आहेत. त्यांपैकी हॅन्डसम लुकिंग अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अङवाणी ही एक जोडी आहे. या कपलला चाहत्यांचे सध्या तरी प्रचंड प्रेम लाभत आहे. कित्येकदा तर कियारा आणि सिद्धार्थ हे एकमेकांसोबत दिसल्याने त्यांच्यात नक्कीच काहीतरी रिलेशन आहे, असे म्हणत त्यांना गंमतीने चिङवण्यात सुद्धा आले. त्यातच आता या दोघांमधील आणखी एक सिक्रेट नुकतेच समोर आले आहे.
हॅन्डसम छोकरा सिद्धार्थच्या 37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची आणि कियाराची जोडी खऱ्या अर्थाने चर्चेत आली. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला चाहत्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. यादरम्यान त्याची गर्लफ्रेंड कियारा अङवाणी हिने देखील त्याच्यासाठी एक स्पेशल पोस्ट शेयर केली होती. ही पोस्ट शेयर करताना तिने सिद्धार्थ सोबतचा आपला हटके रोमॅन्टिक फोटो शेयर केला होता. इतकंच नव्हे तर हा फोटो शेयर करत तिने म्हटले की,”सर्वांत जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.”
कियारा अङवाणी च्या या पोस्टवर सिद्धार्थने जी कमेंट केली. त्याकडे मात्र सर्वांचे लक्ष वेधले गेले. कारण सिद्धार्थने तिला कमेंट्स मध्ये “थँक्स की” असे म्हणत हार्टचा इमोजी सुद्धा शेयर केला होता. त्याचा हा रिप्लाय पाहून तो कियाराला प्रेमाने “की” म्हणत असणार, हा त्याच्या चाहत्यांनी अंदाज लावला. याआधी सुद्धा तिच्या वाढदिवसाला त्याने तिला याच नावाने शुभेच्छा दिल्या होत्या.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अङवाणी हे दोघेही एकमेकांना मागील अडीच वर्षांपासून ङेट करत आहेत. “शेरशाह” चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच काम केले आहे. यामध्ये सिद्धार्थने 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा याची भूमिका साकारली आहे. तर कियारा ने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.