सुबोध भावे घेऊन येत आहेत नवी कोरी मराठी मालिका, हि प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

बुधवार दि. ११ नोव्हेंबर पासून ‘चंद्र आहे साक्षीला’ ही नवीन मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या उत्कंठावर्धक मालिकेत श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे ही निभावणार आहे.

असं म्हणतात की प्रेम आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू. तुमचा तुमच्या प्रेमावरील विश्वास हा एकदा का एकदा तुटला की मग त्या प्रेमाचा पुढील सगळा प्रवास एका मृगजळासारखा वाटू लागतो. समोर दिसत असूनही अगदीच नसल्यासारखं, प्रत्यक्षात त्याच्या समोर जाताच एकदम चकवा देणारं, दुरून पाहतांना रमणीय पण जवळ गेल्यावर मुळात अस्तित्वातच नसणारं.

काहीशी अशीच हळुवार प्रेमकहाणी सुरू होते, ‘चंद्र आहे साक्षीला’ मधील स्वाती आणि श्रीधरमध्ये. पण इथे मात्र कथेला एका रोमांचक रहस्याची किनार आहे. काय असेल हे रहस्य? ज्यामुळे स्वातीचे आणि तिच्यासोबतच श्रीधरचेही संपूर्ण आयुष्य पूर्णतः बदलून जाणार आहे?

सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते, अभिनेते चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. चिन्मय मांडलेकारांच्या कथेतील स्वाती ही मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ मुलगी. ‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’ ही तिची विचारसरणी.

आणि याच मुळे सर्वगुणसंपन्न असून देखील वयाच्या चौतीसाव्या वर्षीही स्वाती अविवाहित आहे. अशाच स्वातीच्या आयुष्यात नकळतपणे श्रीधर प्रवेश करतो आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलतांना दिवस पुढे सरकू लागतात. एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढून ती दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात.

आणि इथेच येते ते रोमांचक, रहस्यमयी वळण! या दोघांचे आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पुर्णपणे बदलून जाणार ? स्वाती आणि श्रीधरच्या फुललेल्या प्रेमाच्या जगात नक्की काय घडणार ? हे सत्य लवकरच रसिकांसमोर या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे.

मालिकेचे निर्माते आणि लेखक चिन्मय मांडलेकर म्हणतात, “या मालिकेच्या निमित्ताने माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुप्रसिध्द अभिनेता आणि माझा पहिला सहकलाकार सुबोध भावे सोबत इतक्या वर्षांनंतर निर्माता आणि अभिनेता या नात्याने आम्ही दोघं एकत्र येत आहोत… सुबोधने आजवर अतिशय चोखंदळपणे मालिकांची निवड केली आहे आणि हेच कारण असावं त्याने या मालिकेचा विषय, श्रीधरची भूमिका ऐकताच होकार दिला…

मालिकेमधील इतर कलाकार देखील गुणी आहेत सगळ्यात महत्वाची आमच्या मालिकेची नायिका ऋतुजा बागवे उत्तम अभिनेत्री आहे… मालिकेमध्ये अनेक उत्तम कलाकरांची फौज आहे यासगळ्यांना घेऊन आम्ही प्रेक्षकांना एक चांगली गोष्ट सांगू पाहतो आहोत.

कलर्स मराठीसोबत गेल्या चार वर्षांपासून माझी ही सलग तिसरी मालिका आहे जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी या मालिका मी लेखक म्हणून करत आहे, या दोन्ही मालिका प्रचंड गाजत आहे याचा मला आनंद आहे… ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे”. स्टार मराठीच्या टीम कडून या मालिकेसाठी हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment