अभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या दमदार संवादीक अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केलेल्या सनी देओलला कुटुंब व मित्रांकडून खूप प्रेम आहे. तोही मित्रांवर, घरच्यांवर खूप मनापासून प्रेम करतो. वेळ देतो. त्यांच्या सोबत फिरायला जातो. त्याचे कोणते न कोणते फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.

नुकताच, सनी देओल आणि त्याची आई प्रकाश कौर यांचा एक गोंडस व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो डोंगरात बर्फात आईसोबत खेळताना दिसत आहे. सनी देओल आणि तिची आई प्रकाश कौर यांचा हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. प्रचंड व्हायरल होत आहे. आई मुलाच्या नात्यावर खूप बोलका व्हिडीओ बनवलेला आहे.

See also  'या' भारतीय क्रिकेटरवर फिदा आहे 'ही' प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

सनी देओलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या आईजवळ डोंगरात दिसतो आहे. काही वेळातच प्रकाश कौर बर्फाचा एक बॉल बनवून सनी देओलच्या दिशेने फेकतात. जो कोणी आई-मुलाच्या प्रेमाचा हा सुंदर – गोड व्हिडिओ पाहत आहे, त्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ नक्कीच आहे.

असो, सनी देओल सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि सतत व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत आहे. सनी देओलने आई प्रकाश कौरसोबत व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले: आपण मोठे होतो, इतरांच्या साठी; पण आईवडिलांच्या साठी छोटेशे गोंडस मुलेच राहू.

पालकांचे प्रेम हे सर्वात मौल्यवान आणि खरे प्रेम आहे, हा क्षण माझ्या संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. हा एक क्षण, जिथे मी माझे बालपण माझ्या आईबरोबर पुन्हा जगलो. ” सनी देओलच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रेमाच्या खूप प्रतिक्रिया उमटत आहेत. सनी देओल लवकरच आर बाल्कीच्या एका थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.

See also  ऐश्वर्या रायमुळे पत्रकारांवर चिडल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या होत्या, 'ऐश्वर्या काय तुझी...'

Leave a Comment