एका बस ड्रायव्हरचा मुलगा ते KGF मधील रॉकी भाई, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेता यशचा थक्क करणारा जीवन प्रवास…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपले स्वप्न सत्यात उतरवणे, जगभरात आपल्या मेहनतीने, कष्टांनी प्रसिद्धी मिळविणे, हे वाटते तितके सोपे नाही. परंतु आज आम्ही तुम्हांला अशाच एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या यशची एक सुंदर यशस्वी सफलतेची कहानी सांगणार आहोत.

69619156

के. जी. एफ. हल्ली प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असणारे हे शब्द. परंतु ही तर फक्त एक छोटीशी झलक आहे. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये तर के. जी. एफ. चा हा अफलातून टीझर पाहून कित्येक जणांच्या तोंडचे पाणी पळाले असेल. पहिल्या के. जी. एफ. मध्ये “सलाम रॉकीभाई” हे गाणे होते. मात्र के. जी. एफ. 2 मध्ये तर सर्वजण रॉकीलाच सलाम करताना दिसत आहेत. अहो… पण तुम्हांला हा रॉकी कोण? त्याची खरी गोष्ट माहित आहे का? खरं तर त्याचे अफाट कष्ट, जिद्द आणि प्राणांपलीकङे केलेली त्याची मेहनत त्याला आज इथपर्यंत घेऊन आली आहे. म्हणून तर आज एका सर्वसाधारण बस ङ्रायव्हरचा मुलगा असलेला हा ‘य’श’ भारतातील सर्वांत मोठा सुपरङुपरहिट सुपरस्टार बनला आहे.

कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये 1986 साली यश चा जन्म झाला. “नवीन कुमार गोंडा” हे त्याचं खरं नाव आहे. यशचे वडील हे अगोदर कर्नाटक परिवहन सेवेमध्ये काम करत होते तर आता ते बंगळूर परिवहन सेवेत कार्य करत आहेत. आपल्या वडिलांबद्दल ही माहिती स्वतः यशनेच सांगितली. कारण आपल्या वडिलांना परिवहन सेवेत काम करायला खूप आवडते. त्यामुळे त्यांची ही आवड त्यांना आपल्या मातीशी समरूप ठेवते, असे त्यांचे म्हणणे आहे.

See also  आमिर खानने घा'ब'रू'न अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत "या" कारणामुळे डान्स करायला दिला होता नकार...

827404 yash radhika pandit

यशचे बालपण हे म्हैसूर मध्ये गेले. तर आपल्या शिक्षणानंतर तो आपल्या सुंदर स्वप्नांसह बंगळूर मध्ये आलात. तेथे एका थिएटर ग्रुप मध्ये तो सहभागी झाला. पुढे मग त्याच्या अभिनयाची सुरुवात ही तेथूनच झाली. यश हा काही अगदीच एका रात्रीत बनलेला स्टार नाही. तर त्याच्या या अप्रतिम यशामागे अनेक दिवसांची मेहनत आहे. इतकंच नव्हे तर, चित्रपटांत मध्ये एन्ट्री करण्याआधी त्याने टेलिव्हिजन सीरियल मध्ये सुद्धा काम केले. कित्येक सिरियल मधून त्याने आपली अभिनयाची मनमोहक भूमिका सादर केली आहे.

सन 2008 मध्ये यशने आपल्या पहिल्या- वहिल्या चित्रपटातून म्हणजेच “मोगिना मन्ड्स” मधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्याने या चित्रपटात सहायक भूमिका साकारली. तसेच याच चित्रपटाची अभिनेत्री राधिका पंडित सोबत त्याचे प्रेमाचे सूर जुळले व त्यांनी एकमेकांसोबत विवाह केला.

See also  बॉलीवूड अभिनेत्री रेखाची मुलगी आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

201906292355167725 KGF actor Yash to be father again SECVPF

यशने ‘रॉ’की’ या चित्रपटातून आपली पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली. त्याने लकी, मिस्टर अॅन्ड मिसेस रामचारी, ईराटक्का यांसारख्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले. पुढे यश कन्नड चित्रपट सृष्टीचा रॉकींग स्टार बनला. मात्र आपण कधी भारतीय चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार होऊ, असे त्याला कधीच वाटत नव्हते.

2018 मध्ये भारतीय के. जी. एफ. ने मेहनती यशला एक विशिष्ट ओळख बनवून दिली. त्यामुळे अनेकांना त्याचे नाव माहित नसले, तरीही तो संपूर्ण जगभरात ‘रॉ’की’भा’ई’ या नावानेच ओळखू लागला. के. जी. एफ.- 1 ने तब्बल 250 कोटींचा जबरदस्त व्यवसाय केला. तर आता के. जी. एफ. – 2 हा देखील सुपरहिट तर नक्कीच होणार, यात तिळमात्र शंका नाही. परंतु तो कितपत अवाढव्य कमाई करेल, याची मात्र अगदी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

yximgixc 1560324797

कर्नाटकातील हा जिद्दी यश आज फक्त कन्नड चित्रपटटांकरता मर्यादित राहिला नसून तो अख्ख्या जगभरात प्रसिद्ध झाला आहे. के. जी. एफ.- 2 च्या फक्त टीझरनेच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. त्यामुळे आता त्याचे फॅन्स देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. थोडक्यात यश आता कन्नड चित्रपटांचा सर्वांत महागडा अभिनेता झाला आहे. तसेच के. जी. एफ.- 2 नंतर तो जगात आणखीच फेमस होईल, यात काही शंका नाही.

See also  अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फो'टाबद्धल त्यांच्या मित्राने सांगितले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपण एवढे हिट झाल्यावरही यशला त्याची मेहनत व अपार कष्ट हे परिस्थिती विसरू देत नाहीत. म्हणूनच आजही अनेक मोठमोठे स्टार्स हे त्याच्या सोज्वळपणाचे व साधेपणाचे खूप कौतुक करतात. आज यशचा जन्मदिवस आहे. तर तो आजही 36 वर्षांचा झाला असून कोणत्याही पाश्र्वभूमीचा आधार नसताना तो आज जगभरात नाव कमावत आहे.

download 2020 09 10t123958962 885297 1599723879

एका सामान्य बस ङ्रायव्हरचा मुलगा चक्क एक रॉकिंग स्टार होतो, तर यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी गोष्ट नाही. यशच्या या भरघोस यशाबद्दल तुम्हांला काय वाटते, हे आम्हांला कमेंट मधून नक्की कळवा.

स्टार मराठी परिवारातर्फे यशला त्याच्या जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व के. जी. एफ.- 2 च्या प्रचंड यशासाठी देखील खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment