अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुली आहेत त्यांच्या इतक्याच सुंदर, सध्या करतात क्षेत्रात काम…
बॉलीवुडची चंदेरी दुनिया असो किंवा मग मराठी सिनेसृष्टीतील लखलखाट असो, स्टारकिङ्स हे आपल्या पॅरेन्ट्समुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात यात काही वादच नाही. बहुतेकदा हे स्टारकिङ्स “हम भी किसी से कम नहीं” असे काहीसे दाखवताना दिसतात. आपल्या स्टार्स आईवडिलांप्रमाणे ते सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वळताना दिसतात. मात्र कित्येकदा स्टारकिङ्स हे आपल्या पॅरेन्ट्ससारखेच अभिनयात रस घेतील की नाही, हे काही सांगता येत नाही. कारण प्रत्येकाचे असे एक वेगळे स्वप्न असते. यामध्ये मराठमोळ्या अभिनेत्री अलका कुबल यांच्या मूलीचे नाव देखील येते.
अभिनेत्री अलका कुबल आणि समीर आठल्ये यांचे लवमॅरेज आहे. समीर आठल्ये हे सिनेमेटोग्राफर आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले व नंतर समीर व अलकाजी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने विवाह करून आपला सुखी संसार थाटला. अलका कुबल यांना ईशानी व कस्तुरी ह्या दोन मूली आहेत. कित्येक मुलं ही आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. परंतु अलका यांच्या मुलींनी मात्र काही निराळेच करियर निवडलेले दिसते.
ईशानी व कस्तुरी या दोन्ही मूली दिसायला अतिशय देखण्या आहेत. त्यांचे अफलातुन फोटोज् तुम्हांला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. ईशानी ही अवघ्या 23 व्या वर्षीच पायलट बनली. तिचे लग्न देखील झाले आणि तिचे पती सुद्धा पायलट आहेत. लहानपणापासून ईशानीला वैमानिक व्हायचे होते. अखेर 2015 मध्ये तिला वैमानिकाचं लाइफटाइम लायसन्स मिळाले. तिच्या पतीचे नाव निशांत वालिया असून तो मूळचा दिल्ली येथील राहणारा आहे. विवाहानंतर ईशानी आपल्या पतीसोबत प्लोरिङामध्ये राहते. आपल्या आई सारखेच या दोन्ही मूलींत अभिनय कौशल्य ठासून भरले आहे. मात्र तरीही अभिनयापासून दूर राहणे, त्या पसंत करतात.
अलका कुबल या “माहेरची साडी” या चित्रपटामुळे एक प्रसिद्ध अभिनेत्री बनल्या. एवढंच नव्हे तर त्यांचे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत, खेङोपाङ्यात जाऊन पोहोचले. अलकाजींचे नाव काढताच “माहेरची साडी” हा चित्रपट कुणाला आठवला नाही तर अगदी नवलच हो….माहेरची साडी हा मराठी चित्रपट त्या काळात तर सुपरङुपरहिट ठरला. त्याचप्रमाणे आजही प्रेक्षकवर्ग हा चित्रपट उत्सुकतेने पाहतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.