‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते मेकअपशिवाय देखील दिसते खूपच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

झी मराठी या वाहिनीवरील “माझ्या नवऱ्याची बायको” या सिरीयल मधील फेम अनिता दाते म्हणजेच तुमची- आमची लाडकी राधिका सुभेदार. आपल्या वाखाणलेल्या अप्रतिम अभिनयाने तिने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत आपली जागा बनवली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.

66535635

अनिता दाते ही सोशल मीडियावर जास्तीत जास्त एक्टिव असते. त्यामुळे ती आपले नवनवीन फोटोज् व व्हिडिओज नेहमीच शेयर करत असते. आपले सर्व अपडेट्स ती फॅन्स सोबत शेयर करते.

अनिताने हल्लीच आपला एक नवीन फोटो आपल्या अकाउंटवर पोस्ट केला होता. तिच्या या फोटोमध्ये ती कमालीची अफलातून सुंदर दिसत आहे. त्यामुळे निश्चितच अनिताच्या या फोटोने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिने शेयर केलेल्या या फोटोत ती झोपेतून उठलेली दिसत आहे.

READ  मराठी बिगबॉस मधील लोकप्रिय जोडी वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांचे झालं ब्रेकअप? जाणून घ्या सविस्तर...

Anita Date Image

या फोटोमधून तिने आपल्या फॅन्सना गुङ मॉर्निंग असे म्हटले आहे. पण काहीही म्हणा, अनिताच्या या फोटोने ज’ब’र’द’स्त धू’मा’कू’ळ घातला आहे. कारण देखील तसे खास आहे. अनिताने या फोटोमध्ये अ’जि’बा’त मेकअप केलेला नाही. पण तरीही ती अतिशय गोड दिसत आहे.

अनिता दाते ही मूळची नाशिकची असून तिचे बालपण व संपूर्ण शिक्षण नाशिक मध्ये झाले आहे. उपेंद्र दाते हे नाट्यक्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून ते अनिताचे काका आहेत. नाशिक मधील कन्या शाळेत तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. तर आपले पुढील शिक्षण तिने पुण्यातून केले आहे.

पुण्याच्या ललित कला नाट्यगृहातून तिने पदवी घेतली आहे. अभिनयाचे वेड तर अनिताला अगदी आपल्या बालपणापासूनच होते. त्यामुळे तिने शाळा व महाविद्यालयात आपला अभ्यास सांभाळून आपली अभिनयाची आवड देखील जोपासली. तिने तेव्हा अनेक लहानमोठ्या नाटकांत काम केले.

READ  'येऊ तशी कशी मी नांदायला' मधील मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून थक्क व्हाल!

“माझ्या नवऱ्याची बायको” ही मालिका तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या मालिकेत अनिता दाते ही मुख्य भूमिका म्हणजे साकारत आहे. यामधील तिचं बोलणं, तिचा नाशिकचा तो गोड स्वभाव, तिचा अभिनय हा प्रेक्षकांना फार आवडतो. या मालिकेमुळेच अनिता अखंड महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण महिला वर्गाचे ती एक प्रेरणास्थान आहे.

66425494

परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अनिताने आपल्या करियरच्या सुरूवातीच्या काळात खूप भूमिका सादर केल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीची जिवलग मैत्रीण म्हणून ती आपल्याला दिसली होती. त्यानंतर सागर कारंडे सोबत अनिताने हलकं फुलकं या नाटकात देखील उत्कृष्ट अभिनय केला आहे.

फक्त एवढ्यावर ती थांबली नाही, तर बॉलीवुड मधील ग्लॅमरस अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासोबत “अय्या” या हिंदी चित्रपटातून सुद्धा तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र झी मराठी वरील “माझ्या नवऱ्याची बायको” ही मालिका अनिता दाते च्या संपूर्ण करियर मधील एक उत्तुंग झेप ठरली.

READ  वा'दातून खुलली होती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे अणि निखिल यांची प्रेमकथा, ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment